शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यक शिक्षकांवर अन्याय

By admin | Updated: July 31, 2016 01:13 IST

लातूर : राज्य शासनाने अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे परिपत्रक काढले आहे़ राज्य शासनाच्या या परिपत्रकातून दुजाभाव करण्यात आला असून

लातूर : राज्य शासनाने अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे परिपत्रक काढले आहे़ राज्य शासनाच्या या परिपत्रकातून दुजाभाव करण्यात आला असून सदरील परिपत्रक रद्द करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक उर्दू शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ केंद्र शासनाने आरटीई कायदा लागू केला़ देशातील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना समान न्याय देण्याची भूमिका कायद्यात असताना राज्य शासनाने त्या फूट पाडून अल्पसंख्यक शिक्षकांवर अन्याय केला आहे़ शिक्षकांना वेळेवर वेतन नाही, विद्यार्थ्यांना गणवेश नाही, विनाअनुदानित धोरण आखून २०१२ पासून मूल्यांकन झालेल्या शाळांना अनुदान मंजूर केले नाही़ अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, बँकेत खाते उघडण्यासाठी टाळाटाळ आदी बाबीत भेदभाव केला जातो, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़ दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासनाने विना अट सेमी इंग्रजीची मान्यता उर्दु शाळेला व अल्पभाषिक शाळांना द्यावी अशी मागणी करण्यात आली़ यावेळी अल्पसंख्यांक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष लायक पटेल, सचिव इस्माईल शेख, उपाध्यक्ष जब्बार सगरे, कोषाध्यक्ष मुजाहिद देशमुख, वहिद शेख, रजाउल्लाह खान, फजल काझी, रियाज सिद्दिकी, इस्माईल सय्यद, मोईज काजी, अझहर शेख, रफीक सय्यद, जावेद शेख, रज्जाकनाना अत्तरवाले, इमाम सय्यद, विखार शेख, यादुल्ला शेख, युनूस नूरसे, कदीर जहागीरदार, नुसरत कादरी आदींची उपस्थिती होती़