शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेत अनंत अडचणी

By admin | Updated: July 13, 2017 01:04 IST

औरंगाबाद : दहशतवादी हल्ल्याला न घाबरता यात्रेकरू त्यापेक्षा अधिक जल्लोषात अमरनाथ यात्रेसाठी पुढे निघाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहशतवादी हल्ल्याला न घाबरता यात्रेकरू त्यापेक्षा अधिक जल्लोषात अमरनाथ यात्रेसाठी पुढे निघाले आहेत. यात औरंगाबादच नव्हे, तर आसपासच्या जिल्ह्यातील दीड हजार भाविकांचा समावेश आहे; मात्र या यात्रेकरूंना आता नैसर्गिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळी रामबाण ते बनिहाल या मार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे घाटावर एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. औरंगाबाद व वैजापूर येथील पाच यात्रेकरूंच्या जीपसमोरील काही अंतरावरच दरड कोसळली होती. सर्वजणसुखरूप असल्याची माहिती या यात्रेकरूंनी मोबाइलवरून ‘लोकमत’ला दिली. अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या यात्रेसाठी औरंगाबाद व आसपासच्या जिल्ह्यातील २३३० यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. यातील दीड हजार भाविक सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. वेगवेगळ्या पथकांत भाविक विखुरलेले आहेत. त्यातील काही भाविकांशी आमच्या प्रतिनिधीने मोबाइलवरून संपर्क साधला असता धावणी मोहल्ल्यात राहणारा युवराज झाला हा युवकाने मोबाइलवर सांगितले की, अनंतनाग जिल्ह्यातून अमरनाथकडे जाण्यासाठी आज सकाळी ६ वाजता ते निघाले होते. सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यान रामबाण ते बनिहाल या मार्गावर जागोजागी दरडी कोसळल्या. आम्ही (जीकेएएक्स ३६४९) या गाडीमध्ये आहोत. स्पीडब्रेकरमुळे गाडीची गती कमी झाली आणि आमच्यापासून सुमारे २० ते २५ मीटर अंतरावर दरड कोसळली. गाडीचा वेग कमी झाल्याने आम्ही वाचलो. युवराजसोबत वैजापूर तालुक्यातील एम.एस. उगले, सीताराम ठोंबरे, जयेंद्र निंबाळकर, ताराचंद पहाडे हे यात्रेकरू आहेत. दरड बाजूला काढण्याचे काम सैनिक युद्धपातळीवर करीत आहेत.दरड कोसळल्यामुळे अमरनाथकडे जाणाऱ्या वाहनांना थांबविण्यात आले आहे. फक्त अमरनाथकडून दर्शन घेऊन येणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनांना जम्मूकडे पाठविले जात आहे. घाटात एकेरी मार्ग सुरू आहे. युवराजने सांगितले की, आमच्या पाठीमागे सुमारे ३०० पेक्षा अधिक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जिथे थांबले तिथे कसलीही सुविधा नसल्याने अनंत अडचणी येत आहेत. यात्रेकरूंनी घरून आणलेल्या दशम्या खाऊन दिवस काढला. नियोजित कार्यक्रमानुसार आम्ही ११ जुलै रोजी अमरनाथ बाबा बर्फानीचे दर्शन घेणार होतो; पण दहशतवादी हल्ला व दरड कोसळल्याने आता शुक्रवारी १४ रोजी सायंकाळी आम्हाला शिवलिंगाचे दर्शन होईल.