शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना बसला फटका

By admin | Updated: November 16, 2014 00:06 IST

वाळूज महानगर : जीटीएलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १४ नोव्हेंबरला रात्रीपासून वाळूज औद्योगिकनगरी, बजाजनगरातील वीजपुरवठा खंडित केला.

वाळूज महानगर : जीटीएलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १४ नोव्हेंबरला रात्रीपासून वाळूज औद्योगिकनगरी, बजाजनगरातील वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर लगेच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्यामुळे औद्योगिकनगरीत काळोख पसरला होता. या लाईट बंदमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा रात्री ११ वाजेनंतर खंडित झाल्यामुळे बहुतांश कारखान्यांतील कामकाज ठप्प पडले होते. विजेअभावी कारखान्यांतील मशिनरी बंद पडल्यामुळे उत्पादन प्रकियाही थांबल्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप औद्योगिक संघटनांनी केला. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे आज पहिल्या शिफ्टमध्ये कामावर हजर झालेले कामगार दिवसभर बसून होते. सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू न झाल्यामुळे संतापलेल्या उद्योजक व ग्राहकांनी जीटीएल कार्यालयाकडे मोर्चा वळविला. या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. संतापलेल्या ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरताच त्यांनी धूम ठोकली. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा लवकर सुरू होईल, असे आश्वासन दिल्याने उद्योजक आणि नागरिकांनी माघार घेतली. उद्योजकांची गैरसोय लक्षात घेऊन मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी औद्योगिक क्षेत्रात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी एक कार्यकारी व दोन कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली. दुपारनंतर वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे दुसऱ्या शिफ्टपासून कामकाज सुरू झाले.