जालना : येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण केले. गतवर्षी पेक्षा महसुलात ११.१९ टक्क्यांनी वाढ झाली.२०१३- १४ या आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट २८.५८ कोटींचे उद्दिष्ट होते. कार्यालयाने विविध मोहिमा राबवून २८.८२ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले. गतवर्षी कार्यालयाने २५.७४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. आरटीओ कार्यालयाने नवीन वाहन नोंदणी, वाहनांवरील विविध कर, दंड तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधाकरकांकडून दंड आकारुन महसुल उद्दिष्टात मोठी वाढ केली आहे. २०१३-१४ च्या सुरुवातीच्या काळात अत्यल्प पाऊस झाला. यामुळे वाहनखरेदी तसेच विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. कार्यालयाच्या वायूवेग पथकाने कामगिरी करीत २०१३-१४ १४८.४६ लक्षांक एवढे उद्दिष्ट पूर्ण झाले. २०१२-१३ मध्ये वायूवेग पथकास तडजोड शुल्काचे १२७ लक्षांक असताना १०४. १९ (८२) टक्के एवढी वसुली करण्यात आली. वायूवेग पथकाने आॅटोरिक्षा, ओव्हरलोड मालवाहतूक, लक्झरी बसेस यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आल्याचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)एप्रिल१,३८,६४४६६१,९६,७५,८४०२,४८,२२,१५८मे२,०२,२३,६७८१,९६,१५,०१७२,४३,५०,५३०जून१,७५,५२,३६६१,५६,०३,३७३१,६६,२८,२३५जुलै२,२२,१९,१३२१,७०,७७,२०५२.०७,६३,२४५आॅगस्ट१,९१,६२,२४९१,८६,७२०१४ -सप्टेंबर१,६५,७५,३२५२०२,१६,२२६ -आॅक्टोबर२,१७,२५,७८९२०२,१६,२२६ - नोव्हेंबर३,०५,९१,१४३३,५३,९२,४०६ -डिसेंबर२,२७,९३,५६६२,४२,८८,६५१ -जानेवारी२,९५,६७,७७०३,३६,४६,७७० -फेब्रुवारी२,१५,१०,९४९२,३९,३४,७१७ -मार्च२,१६,६५,८६६२, ८५, ८५,७१० - एकूण२५,७४,५२२९९२८,८१,७३,५२३ -
आरटीओच्या महसुलात वाढ
By admin | Updated: August 20, 2014 01:49 IST