औरंगाबाद : सोशल मीडियाचा वापर हसण्यासाठी, विनोद सांगण्यासाठी होत आहे. आजची पिढी तो फॉरवर्ड करून इतरांनाही त्या आनंदात सहभागी करून घेत आहे. सोशल साईटस्वरील जोक्स आणि वेगवेगळे फनी पिक्चर्स पाठवून एकमेकांचे मनोरंजन करण्याची क्रेझ नेटिझन्समध्ये निर्माण झाली आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉटस्अपद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या विनोदांचे शेअरिंग केले जात आहे. त्यात मग दैनंदिन जगणे व जीवनातील घटनांसंदर्भातील विनोद असोत किंवा अन्य प्रसंगी घडलेल्या घटना असोत त्याला थोडीफार विनोदी भाषेची जोड देऊन एकमेकांमध्ये शेअरिंगची क्रेझ वाढलेली दिसते. व्यंगचित्रे आणि मजकुराचा वापर करून तयार करण्यात आलेले विनोद एकमेकांना शेअर करून सगळेच जण आनंद लुटतात. असाच एक ग्रुप औरंगाबादेत सक्रिय आहे. या ग्रुपमधील सदस्यदेखील कुठे तरी वाचनात आलेला किंवा ऐकलेला विनोद एकमेकांना शेअर करत असतात.फेसबुकवर सर्चिंग ब्राऊजरवर जोक टाईप करताच या ग्रुपची ओळख पटते. या गु्रपला एकूण ८,९१४ मंडळींनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या ग्रुपमधील एकाने रजनीकांत व्हर्सेस सीआयडी जोक्स या साईटवरील फनी छायाचित्रांसह संदेशाची देवाणघेवाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच पद्धतीने नवनवीन विनोदांचे शेअरिंग होण्यास सुरुवात झाली. या शेअरिंगमुळे नेटिझन्सना मनोरंजनाचे साधन मिळाले. या उद्देशाने केलेले विनोदाचे शेअरिंग हसण्याजोगे नक्कीच असते.या पेजचा होतो सर्वाधिक वापररजनीकांत व्हर्सेस सीआयडी या वेब पेजचा सर्वाधिक वापर होत आहे. या पेजला विनोदांच्या सर्व पेजेसपेक्षा जास्त म्हणजे ५३,२६,९०८ नेटिझन्सनी पसंती दिली आहे. या पेजवर टाकण्यात आलेल्या पिक्टोरिअल (सचित्र) जोक्सची सर्वांनीच शेअरिंग करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते. प्रसिद्ध अभिनेत्यांचे फोटो व ब्रॅकेटमध्ये संभाषण टाकून त्यांला व्यंगरूप देऊन त्याचे शेअरिंग केले जाते. या वेब पेजवर लव्ह लाईफसंदर्भातील छोटे-छोटे चुटकु लेदेखील शेअर केले जातात. यामुळे मन प्रसन्न झाल्याचा अनुभव नेटिझन्सना मिळतो.लोकप्रिय वेब पेजेस जोक्स अँड फनी पिक्चर्स, जोकेझोन कम्युनिटी, ओनली जोक्सआणि जोक तसेच रजनीकांत व्हर्सेस सीआयडी, सीआयडी जोक्स, टॉम अँड जेरी या वेब पेजेसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यापैकी काही पेजेसद्वारे विनोदाच्या अंगाने वा विनोदी स्वरूपात परंपरा व सणावारांचे महत्त्वदेखील पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.नैसर्गिक हास्याचा विसरसोशल साईटचा वापर करून नेटिझन्स हसण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांचे तेव्हाचे ते मुरक्या मुरक्या हसणे हे नैसर्गिक नसते. नैसर्गिक हास्याने निरोगी राहता येते. परंतु सोशल साईटस्वरील जोक्स वाचून येणारे हास्य हे मुळीच नैसर्गिक नाही. या जोक्सने तात्पुरते मनोरंजन नक्कीच होईल. त्याचबरोबर मनही प्रसन्न झाल्याचे वाटेल; पण तेवढ्यापुरतेच.- कुलदीप मुळे, नेटिझनसोशल साईट हाच मोठा विनोद प्रेषित रुद्रवार म्हणतो, सोशल साईटचा वापर कसा व कोठे करावा, याचा विसर नेटिझन्सना पडला असल्याचे चित्र आहे. कारण आज घरी जेवणास काय बनवले या विषयापासून ते आज रात्री मी किती वाजता झोपणार या सर्व गोष्टींचे शेअरिंग याद्वारे होत आहे. ही परिस्थितीच हाच मोठा जोक बनला आहे. विनोद शेअरिंग करण्यापेक्षा आपल्या अवतीभोवतीच्या घटनांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ते महत्त्वाचे आहे. - प्रेषित रुद्रवार, नेटिझनविनोदाची पातळी घसरली घराघरांत घडणाऱ्या छोट्या- मोठ्या घटना रंगवून सांगण्याचे माध्यम म्हणून सोशल साईटचा वापर केला जात आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक घटनेकडे विनोदी अंगाने व खुल्या मनाने बघण्याचा दृष्टिकोन विकसित होत आहे. विनोद कोणत्या गोष्टीचा, किती प्रमाणात व कोठे करावा या गोष्टीचा विसर पडला आहे, असे निरीक्षण काही नेटिझन्सनी केले आहे.क्रिएटिव्हिटी डेव्हलप होतेया पेजेसवर नवनवीन संदेशांबरोबरच नवनवीन व्यंगचित्रांचीदेखील देवाण-घेवाण होते. त्यामुळे मनोरंजन नक्की होते. शिवाय त्याचबरोबर नवीन व्यंगचित्रे कुठे असतील हे सर्च करण्याची उत्सुकतादेखील वाढते. ते सापडल्यास मित्रमंडळींना शेअर करीत असतो. - ज्योती पवार
वाढली हसण्याची व्याप्ती...!
By admin | Updated: July 1, 2014 01:07 IST