शिरूर अनंतपाळ : पीक पेरा वाढवून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त उत्पादन मिळावे यासाठी येथील तालुका कृषी कार्यालयाने शासनाच्या विविध योजनांद्वारे ‘प्रकल्प पीक’ पद्धतीचा अवलंब केला आहे़ यासाठी तालुक्यातील सातशे हेक्टर्स जमिनीची विविध गावांतून निवड करण्यात आली आहे़ या प्रकल्प पीक पद्धतीचा शेतकऱ्यांना अनुदानित आणि विनाअनुदानित या दोन्ही तत्त्वावर लाभ देण्यात येणार आहे़कृषी विकासाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी येथील तालुका कृषी अधिकारी डी़बी़ सुतार आणि अनंत गायकवाड यांनी तालुक्यातील बारा गावांची निवड केली आहे़ या बारा गावात प्रकल्प पीक पद्धतीचा अवलंब करून घटणारी उत्पादकता त्याचबरोबर कलौघात घटणारे विविध पिके यांचा पीक पेरा वाढविण्यासाठी एकंदर सातशे हेक्टर्सची निवड करण्यात आली आहे़ या प्रकल्प पद्धतीद्वारे प्रायोगिक तत्वावर विविध पिकांची लागवड करण्यात आली असून, प्रकल्पात भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे़ यासाठी तालुका कृषी कार्यालयाने १२ कृषी सहाय्यकांची नियुक्तीसुद्धा केली आहे़ प्रकल्प पद्धतीचा शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होणार आहे़ त्यात पिकांचे उत्पादन तर वाढणार आहे़ त्यात पिकांचे उत्पादन तर वाढणार आहे़ शिवाय, काही पिकांच्या बियाणास अनुदान मिळणार आहे़ (वार्ताहर)या पिकांचा समावेश़़़प्रकल्प पीक पद्धतीमध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ऊस या पिकांचा समावेश आहे़ या पिकांचे उत्पादन वाढवून त्याचा अधिकाधिक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी ही प्रकल्प पद्धती राबविण्यात येत आहे़ या गावची निवड़़़४प्रकल्प पीक पद्धतीसाठी बिबराळ, कांबळगा, गणेशवाडी, थेरगाव, आरी, वांजरखेडा, हालकी, शिरूर अनंतपाळ, कारेवाडी, बेवनाळ, तळेगाव दे़ या बारा गावांची निवड करण्यात आली असल्याचे सुतार, गायकवाड यांनी सांगितले़
उत्पादकता वाढविण्यासाठी ‘प्रकल्प पीक’
By admin | Updated: July 24, 2014 00:10 IST