शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

यंदा भूजल पातळीत वाढ

By admin | Updated: May 21, 2014 00:19 IST

जालना : जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा भूजल पातळीत वाढ झाली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच पूर्ण करून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे

 जालना : जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा भूजल पातळीत वाढ झाली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच पूर्ण करून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे. भूजल विकास यंत्रणेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील विहिरींची भूजल पातळी मोजण्याचे सर्वेक्षण केले जाते. २०१३ मध्ये आॅक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, अंबउ व घनसावंगी या तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याचे लक्षात आले होते. तर मार्च २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ११० विहिरींची भूजल पातळी मोजण्याचे काम सुरू आहे. या विहिरींची पातळी चांगल्याप्रकारे वाढल्याचे दिसून आले आहे. पर्जन्यमान आणि सरासरीच्या आधारे पाणी पातळी ३ मीटरपेक्षा खाली गेल्यास तो भाग टंचाईग्रस्त असल्याचा अंदाज काढता येतो, असे कनिष्ठ भूजल वैज्ञानिक डॉ. एस.जी. गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येक वर्षी चारवेळा भूजल सर्वेक्षण केले जाते. पाऊस पडण्यापूर्वी मे महिन्यात आणि पाऊस पडल्यानंतर जानेवारी ते मार्च या महिन्यात ही तपासणी केली जाते. यावर्षी सद्यस्थितीत ११० विहिरींची भूजल पातळीचे सर्र्वेक्षण सुरू असून आतापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक सर्वेक्षणाचे काम झालेले आहे. त्याद्वारे भूजल पातळीत वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाजही वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी ११० विहिरींचे भूजल सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात १०७ विहिरींची पातळी ३ मीटरपेक्षा अधिक होती. तर भोकरदन, जाफराबाद, अंबड या तालुक्यातील तीन विहिरींची पातळी खाली होती. मात्र यंदा मार्च २०१४ मध्ये या विहिरींची पातळी वाढली आहे. भूजल सर्र्वेेक्षण विभागाने सदरील ठिकाणी जलपुनर्भरण मोहीम राबविल्याने पाणी पातळीत वाढ झाल्याचा दावाही या विभागाच्या अधिकार्‍यांकडून केला जात आहे. उटवद येथील प्राथमिक शाळेच्या छतावरील पाणी जमिनीत जिरवल्याने तेथील विहिरी, हातपंपांमध्ये पाणी वाढल्याचे गायकवाड यांनी सांगितले. भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे बळकटीसाठी स्थानिक परिसरानुसार सिमेंट बंधारे, चर, आणि जलपुनर्भरणाचे अनेक प्रयोग झाल्याने जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी) पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत विविध कारणांमुळे कमी होत आहे. परंतु जमिनीतील पाणी अमर्याद उपसले जात आहे. परिणामी भूजल पातळी जलदगतीने खाली जात आहे. पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलपुनर्भरण काळाची गरज बनली आहे. मात्र प्रशासकीय स्तरावरून पाहिजे तशी सकारात्मक कृती केल्याचे दिसून येत नाही. पुनर्भरणासाठी विविध विभागाने केलेल्या योजना कागदावरच आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबर २०१३ व मार्च २०१४ मध्ये झालेल्या भूजल सर्व्हेक्षणानुसार पाणी पातळीत वाढ झाली आहे. तालुका २०१३ २०१४ जालना १.०६ मी. १.५१ बदनापूर १.७४ ०.९४ भोकरदन १.४८ ३.३० जाफराबाद १.१० ३.८३ परतूर २.६१ २.८९ मंठा ०.०८ २.८९ अंबड ०.५५ १.२३ घनसावंगी २.४९ २.८४