औरंगाबाद : राज्यात पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. भूजल पातळी खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सोडवायचा असेल, तर भूजल पातळी वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भूशास्त्रीय अभ्यास करून विविध उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी व्यक्त केले. देवगिरी महाविद्यालयात आयोजित भूगर्भशास्त्र विभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण होते. व्यासपीठावर संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अॅड. मोहनराव सावंत, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य माणिकराव जाधव आदी उपस्थित होते. बिराजदार पुढे म्हणाले, राज्यातील भूपृष्ठाचा शास्त्रीय अभ्यास करून भूपृष्ठाच्या आत पाणी मुरविण्याच्या दृष्टीने योजना राबवून जनतेत जागृती निर्माण करणे गरजेचे आहे, असेही बिराजदार म्हणाले.दोन दिवसांत एकूण ७२ शोधनिबंध सादर करण्यात येणार आहे. डॉ. माणिकराव जाधव यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण सोनुने यांनी केले.
पाणीटंचाई सोडविण्यासाठी भूजल पातळी वाढवावी
By admin | Updated: January 4, 2015 01:14 IST