औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ३३ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ३४ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ९८७ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३३ रुग्णांत मनपा हद्दीतील २६, ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २३ आणि ग्रामीण भागातील ११, अशा एकूण ३४ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. बजरंग चौकातील ६३ वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
चिकलठाणा १, उल्कानगरी १, साई पार्क, एन सात सिडको १, एन नऊ एम दोन १, संत ज्ञानेश्वर नगर, हडको ३, गारखेडा परिसर ३, जय भवानी नगर २, भावसिंगपुरा १, छावणी १, बजरंग चौक १, सूतगिरणी चौक १, आकाशवाणी परिसर १, अन्य ९
ग्रामीण भागातील रुग्ण
अन्य ७