शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उमरी तालुक्यात ‘प्रभारीराज’मुळे गैरसोय

By admin | Updated: June 28, 2017 00:29 IST

उमरी : प्रयोग करणारे उपक्रमशील शेतकरी, सुपीक जमीन, सिंचनाच्या सोयी अशा सर्व सुविधा असल्या तरी कृषी खात्याकडे पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत़

बी.व्ही.चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : मोठ्या संघर्षानंतर सन १९९९ साली अस्तित्वात आलेल्या उमरी तालुक्याला महत्त्वाच्या खात्यात अनेक वर्षांपासून प्रभारी कारभार चालत असल्याने प्रशासकीय कामे ठप्प झाली़ पर्यायाने जनतेची गैरसोय होत असल्याचे विदारक चित्र आहे.कृषीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात वर्षानुवर्षे प्रमुख अधिकाऱ्यांचे पद रिक्त राहते़ जानवारी २०१६ पासून येथील पदभार धर्माबाद तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आहे़ तालुक्यातील शेतीचे क्षेत्र व होतकरू शेतकरी गट, पीक उत्पादनात नवनवीन प्रयोग करणारे उपक्रमशील शेतकरी, सुपीक जमीन, सिंचनाच्या सोयी अशा सर्व सुविधा असल्या तरी कृषी खात्याकडे पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत़ सद्य:स्थितीत अनेक कृषी योजना अर्धवट स्थितीत पडून आहेत़ उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे पद गेल्या आठ वर्षांपासून रिक्त आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्रभारी कार्यभार चालू आहे़ यामुळे वैद्यकीय सेवेबरोबर प्रशासकीय कामकाजावर याचा विपरीत परिणाम होत आहे़ नांदेड जिल्ह्यातील एक हेवी सेंटर म्हणून उमरीचे ग्रामीण रुग्णालय समजण्यात येते़ मात्र वैद्यकीय अधिकारी व प्रमुखांची पुरेशी सोय नसल्याने रुग्णांचे हाल होतात़ अंगणवाड्यांच्या कामकाजावर नियंत्रण असणारे एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी पद २ वर्षांपासून रिक्त आहे़ अगोदर लिपिकाकडे व नंतर आता प्रभारी बीडीओकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला़ एक वर्षापासून आहारभत्ता नाही, कार्यकर्ती, मदतनिसांचे मानधन ३ महिन्यापासून नाही, कर्मचाऱ्यांची प्रवासभत्ता बिले नाही, अशा अनेक समस्या या कार्यालयाकडे आहेत़तालुक्याच्या दोनशेपेक्षा अधिक ग्रामविकासाच्या योजना चालविणाऱ्या पं. स. बीडीओंचे पद गेल्या ९ महिन्यांपासून रिक्त आहे़ प्रभारी अधिकारी एम़ एऩ केंद्रे हे एकात्मिक बालविकास व पंचायत समितीचे बीडीओ अशा दोन्ही कार्यालयाचे कामकाज पाहतात़ महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रभारी आहेत़ तालुका भूमी अभिलेखचे उपअधीक्षक पद गेल्या १ वर्षापासून रिक्त असून मुदखेड येथील के़ एऩ जेठेवाड यांच्याकडे उमरीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला़जलसंपदा, पशुवैद्यकीय, टपाल, दूरध्वनी इ. कार्यालयांच्या बाबत अशीच स्थिती आहे़ येथे अधिकारी राहत नाहीत व कर्मचारीही पुरेसे नाहीत़ अशा प्रकारे तालुक्याच्या कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणेची अवस्था पाहता, जनतेची कामे वेळेवर व सुलभरीत्या कशी होणार, हा एक प्रश्नच आहे़