शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंच्या विकासकामांची चौकशी सुरू

By admin | Updated: July 14, 2017 00:44 IST

औरंगाबाद : शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय वैमनस्य आता प्रशासकीय उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय वैमनस्य आता प्रशासकीय उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहे. कन्नडचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांनी खासदार निधीतून झालेल्या कामांची प्राथमिक स्तरावर चौकशी करण्यास गुरुवारी सुरुवात केली. ग्रामपंचायतीकडील कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल गोपनीय असेल. जिल्हाधिकारीच त्या अहवालावर निर्णय घेतील.प्रत्येक वर्षी खासदाराला पाच कोटी रुपये विकासनिधी म्हणून मिळतात. ही रक्कम खर्च करण्याचा निर्णय खासदार घेत असतात. आपल्या मतदारसंघात नागरिकांच्या गरजेनुसार योजना तयार केल्या जातात. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करवून घेते. खा. खैरे यांनी कन्नड मतदारसंघात जी गावेच नाहीत, त्या गावांत खासदार निधीतून कामे केल्याचे दाखविण्यात आले. खा. खैरे यांच्या निधीतून करण्यात आलेल्या त्या कामांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे आ. जाधव यांनी २३ जून रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. खापेश्वर, शिंदेवाडी, मांडवा, झाडेगाव तांडा आणखी काही गावे कन्नडमध्ये नाहीत. ‘ती’ गावे इतर कुठे असतील; परंतु कन्नडमध्ये असल्याचे दाखविले आणि गावे नसताना गावांच्या नावावर रक्कम उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी आ. जाधव यांच्याकडे केला होता. माझ्या मतदारसंघात अशी खोटी नाटी कामे होत असतील, तर मला बोलावेच लागेल, अशी भूमिका घेत आ. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली. खैरेंवर शिवसेनेच्या सरपंचानेच आरोप केलेले आहेत, मी केलेले नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली होती. उपविभागीय अधिकारी म्हणाले,उपजिल्हाधिकारी श्रीमंत हरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, खा. खैरे यांच्या विकासनिधीतून झालेल्या कामांची प्राथमिक चौकशी केली आहे. चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. तो अहवाल गोपनीय असेल. ग्रामपंचायतींकडून कागदपत्रे मागविली आहेत. त्यानुसार अहवाल तयार करण्यात येईल. चौकशीला जास्त दिवस लागणार नाहीत. तसेच चौकशी किती दिवसांत करावी, याचेही बंधन नाही. चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर तेच पुढील निर्णय घेतील.