( जाहिरात बातमी )
औरंगाबाद : ग्रीव्हज कंपनीचे मराठवाडा रिटेल आऊटलेट विद्युतयंत्र ई मोबिलीटी प्रा. लिमिटेड शोरूमचे उदघाटन थाटात पार पडले.
जालना रोडवरील सेव्हनहिल उड्डाणपूलजवळील राज हाईट येथे शोरूमचे उद्घाटन सीआयआयचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी मसीआचे अध्यक्ष अभय हंचनाल, ग्रीव्ह्ज कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक तुषार ढेकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील सर्वात मोठे व प्रथम श्रेणीतील दालन आहे. यामुळे इलेक्ट्रिक बाईक्स खरेदीसाठी ग्राहकांना मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.
दोन आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने आणि ग्रीव्हज केअर सेल्स ॲड सर्विसेस येथे उपलब्ध आहेत. येथील सर्व गाड्या या विजेवर चालणाऱ्या असून, प्रदूषणमुक्त आहेत. उच्च दर्जाच्या चार्जेबल बॅटरी तसेच उत्तम वेग हे या वाहनांचे मूळ आकर्षण आहे. ॲम्पिअर दुचाकी अणि ऐले तीन चाकी व्यावसायिक या श्रेणी येथे उपलब्ध आहेत. ऍड. सुनील जाधव यांनी ‘ॲम्पिअर प्रो'' खरेदी करून येथील पाहिले ग्राहक होण्याचा मान मिळविला.
इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचे आवाहन आयोजक आशिष अग्रवाल, श्रीकांत जोशी अणि आशिष नरवाडे यांनी सर्वांना केले.
याप्रसंगी सूर्य प्रकाश, प्रफुल्ल कानडे संदीप नागोरी, विनोद गांधी, प्रशांत नरवाडे, दिगंबर गाडेकर, अनिल पाटील, रवींद्र कोंडेकर, विशाल लदनिया, अमित सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.