१२ मार्च रोजी सायं. ७ ते ८: १५ यावेळेत हे वेबिनार होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता ९ वी ते १२ वी (सेकंडरी स्टेज) हा शिक्षणातला एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे. याशिवाय नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात अनेक बदलही झाले आहेत. या नव्या बदलांचा लाभ घेऊन तुमच्या करिअरला आकार कसा द्यायचा, याविषयी डीएफसीचे संचालक तथा शिक्षणतज्ज्ञ गोविंद काबरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
करिअरच्या प्रत्येक वळणावर स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. इयत्ता ९ वी मध्येच अभ्यासाची पद्धती थोडीफार बदलली तर दहावी बोर्डाची तयारी तर होतेच, पण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास पद्धतीचाही पाया पक्का होतो. याविषयीही तसेच अभ्यासाच्या योग्य पद्धती, अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि विचारपद्धती कशी सकारात्मक ठेवायची, याविषयी काबरा सविस्तर मार्गदर्शन करतील.
चौकट :
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी http://bit.ly/DFC1203 या लिंकवर भेट देऊन नावनोंदणी करावी. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १००० विद्यार्थ्यांना झूम ॲक्सेस आणि सेल्फ स्टडी चार्ट देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९२२५३१८७२७ या क्रमांकावर संपर्क करावा.
चौकट :
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी करिअर घडविण्यासाठी काही सवयी आणि कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. सवयी आणि कौशल्ये स्वत:त रुजविण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून, अभ्यासासोबतच ते कसे शक्य आहे, हे जाणून घेण्यासाठी सध्या ८ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वेबिनारमध्ये अवश्य सहभागी व्हावे.