शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

सोयाबीनवर चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST

परभणी : जिल्ह्यात सोयाबीन पिकाला किडीने घेरले आहे. चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव वाढला आहे.

परभणी : जिल्ह्यात सोयाबीन पिकाला किडीने घेरले आहे. चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव वाढला आहे. यावर्षी जिल्ह्यात पिकांची परिस्थिती नाजूक आहे. दोन महिने उलटल्यानंतरही पाऊस समाधानकारक झाला नाही. शेतकऱ्यांना दोन, काही ठिकाणी तीनवेळा पेरणी करावी लागली. पेरलेले कसेबसे जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्य पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. पाऊस नसल्याने पिकांची वाढ मंद गतीने होत आहे. त्यातच रोगाचा प्रादूर्भाव झाला असल्याने पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन पिकावर सध्या चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव दिसत आहे. या किडींनी अंडी घालू नयेत म्हणून सुरुवातीला ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, प्रादूर्भाव दिसू लागल्यास प्रादूर्भावग्रस्त फांद्या व खोड आतील अळीसह नष्ट करावे. पिकाचे नियमित सर्व्हेक्षण करुन किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास पुढील प्रमाणे फवारण्या कराव्यात. ट्रायझोफॉस ४० टक्के २० मि.ली., प्रोफेनोफॉस ५० टक्के २५ मि.ली., इथोफेनप्रॉक्स १० टक्के २० मि.मी. किंवा अ‍ॅसीफेट ७५ टक्के १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावे. खोड माशीच्या नियंत्रणासाठी वरील कोणत्याही एका कीटकनाशकासह थायोमीथोक्झाम २५ टक्के २-३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. फवारणीसाठी पॉवर स्प्रे असल्यास कीटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर माळेगावकर व कीड नियंत्रक कमलाकर सुपेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)चक्रीभूंगा ही खोड पोखरणारी सोयाबीनवरील मुख्य कीड आहे. पिकांचे ३५ टक्क्यापर्यंतचे नुकसान या किडीमुळे होते. या किडीचा प्रौढ भूंगा व अळी या दोन अवस्था नुकसानकारक असतात. मादी भूंगा पानाचे देठ किंवा खोड यावर दोन समान काचा करते व खालच्या खाचेवर अंडी घालण्यासाठी तीन छिद्र पाडते. खाच केलेला खोडाचा वरचा भाग दोन-तीन दिवसांत सुकण्यास सुरुवात होते व पानाच्या देठावर खाचा केल्यास पान वाळून जाते. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ व खोड पोखरत जमिनीकडे जाते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडास शेंगा कमी लागतात व उत्पादनात घट होते. खोड माशी या किडीमुळे सोयाबीनचे १०० टक्के नुकसान होऊ शकते. मादी माशी झाडाच्या वरच्या पानामध्ये अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी पान पोखरुन शिरेपर्यंत पोहचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर अळी खोडात शिरते. अशा प्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोहचते व कोषामध्ये जाते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडास फुले व शेंगा कमी लागतात. शेंगामध्ये दाणे लहान व सुरकुतलले असतात. तसेच खोड माशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर झाड पूर्णत: वाळून जाते. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.