शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल

By admin | Updated: November 11, 2016 00:33 IST

कळंब पालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे़

उन्मेष पाटील कळंबपालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे़ या प्रचारात गर्दीचे ‘ग्लॅमर’ लाभावे यासाठी काही उमेदवारांनी रोजंदारीवर कार्यकर्ते गोळा करण्याची शक्कल लढविली आहे. या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दिवसाकाठी ३०० रुपये रोजंदारी दिली जात आहे़शहरात सध्या पालिका निवडणुकीची हवा गरम आहे. सर्वच पक्षांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. काही उत्साही उमेदवारांनी प्रशासनाने अधिकृतरीत्या चिन्ह वाटप करण्यापूर्वीच डिजिटल फलक लावण्याची घाई केली आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह कायमस्वरुपी असल्याने चिन्ह वितरित करण्याची वाट कशामुळे बघायची, असा प्रश्नही या उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला असला तरी सर्वांनाच कार्यकर्त्यांची वाणवा जाणवत आहे. गावपुढाऱ्यांनी ‘यूज अँड थ्रो’ भूमिकेने कार्यकर्त्यांचा वापर केल्याने कार्यकर्ते विशेषत: युवक मंडळी सध्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उतरल्याचे दिसून येत नाही. सत्तेचा लाभ काही मूठभरांना दिला जातो व निवडणुकीत कार्यकर्त्यांना जाती-धर्माच्या नावावर भावनिक ब्लॅकमेल केले जाते व त्यांचा केवळ वापर केला जातो असा सूर या युवकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळेच सर्वच प्रमुख पक्षांना सध्या सक्रिय कार्यकर्त्यांची कमतरता भासत आहे. यावर उपाय म्हणून आता भाडेतत्त्वावर कार्यकर्ते घेतले जाऊ लागले आहेत. महिलांसह नागरिकांना ३०० रुपये दररोज प्रचारासाठी देण्याची आॅफर काही उमेदवारांनी दिली आहे़ तर युवकांची संख्या वाढविण्यासाठी काही उमेदवारांनी ४०० ते ५०० रुपये देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या सिझननंतर मोलमजुरी करणाऱ्या महिलांना हा ‘इलेक्शन’ सिझन चांगलच लाभदायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभर प्रचार केल्यानंतर या प्रचारातील रोजंदारी कार्यकर्त्यांना भोजनाचीही व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा आहे. पाच वर्षे कार्यकर्त्यांना न सांभाळणाऱ्या पुढाऱ्यांवर कंत्राटी कार्यकर्ते घेण्याची वेळ आली असताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांकडे मात्र स्वखर्चाने प्रचारात उतरलेल्या कार्यकर्त्यांची चांगली फळी दिसून येत आहे. शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनीही या युवकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडून येईल, असा विश्वास या नवख्या उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.