पळशी हा परिसर डोंगराळ भागाला लागून असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर विविध जातींचे झाडेझुडपे आढळून येतात. मात्र, या परिसरातील व्यापारी हे इलेक्ट्रिक कटर मशीनच्या साहाय्याने झाडे कापून सर्रासपणे विक्री करीत आहेत. एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा असे म्हणत झाडांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. आणि दुसरीकडे वनसंपदा अशी सर्रास तोडल्या जात असल्याने शासनाची दुटप्पी भूमिका यातून स्पष्ट होत आहे. दिवसातून अनेक झाडे कटाई करून विकली जात आहेत. यामुळे परिसरातील झाडांची संख्या घटत असून याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे वनविभागाचे अधिकारी डोळे झाक करीत असल्याने वृक्ष तोडणारांचे फावत आहे. अवैध प्रकारे होणारी ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
फोटो : पळशी परिसरात झाडे तोडून अशी ट्रॅक्टद्वारे वाहतूक केली जात आहे.