शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूर तालुक्यात १९० ठिकाणी अवैध दारू विक्री

By admin | Updated: June 21, 2017 23:43 IST

जिंतूर : शासनाने दारूबंदी केल्यानंतर जिंतूर शहरात ४० तर ग्रामीण भागात १५० ठिकाणी अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू झाली असून, यामधून दररोज आठ ते दहा लाखांची उलाढाल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शासनाने दारूबंदी केल्यानंतर जिंतूर शहरात ४० तर ग्रामीण भागात १५० ठिकाणी अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू झाली असून, यामधून दररोज आठ ते दहा लाखांची उलाढाल होत आहे.जिंतूर शहरात असलेले एक वॉईनशॉप व चार बार शासनाच्या निर्णयाने बंद झाले. यामुळे सामान्य माणूस, महिला वर्ग आनंदित झाला खरा; परंतु, हा आनंद क्षणिक ठरला. शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलवर, या परिसरातील दोन टपऱ्या, जि. प. मैदान, शिवाजी चौकातील कॉम्प्लेक्स, एका लॉजवर, येलदरी रस्त्यावर तीन ठिकाणी, मोंढा परिसरात दोन, संत सावता मंदिर परिसर, गणपती चौक भागात २ ठिकाणी बेरोजगार युवक खुलेआम अवैध दारू विक्री करीत आहेत. हुतात्मा स्मारक परिसरात तीन ठिकाणी, सरकारी दवाखान्यासमोर, तहसील कार्यालय परिसर आदी ठिकाणी सहजतेने दारू विक्री होत आहे. विशेष म्हणजे, मंठा, सेलू, परभणी येथून मोठ्या प्रमाणावर दारू आणली जाते. एका बॉटलमागे ७० रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यत नफा कमावला जातो. जिंतूर शहरामध्ये दोन ते तीन ठिकाणी बनावट दारू बनविली जाते. काही दिवसांपूर्वी याची चित्रफित व्हायरल झाली होती. शिवाजी चौकातील एका कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार चालतो. बनावट दारू बनविणाऱ्या काही जणांनी ही दारू ग्रामीण भागातही पोहोचविण्यासाठी माणसे नेमली आहेत. शहरातील परिस्थितीप्रमाणेच ग्रामीण भागात सर्रास दारू विक्री सुरू आहे. गावागावांत पानटपरी व दुकानांवर खुलेआम दारू उपलब्ध होेते. विशेष म्हणजे पोलिसांची त्यांना कसलीही भीती नसल्याचे दिसून येत आहे.