शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा

By राम शिनगारे | Updated: December 13, 2024 19:37 IST

जिवाशी खेळ मालिका: जेनरिक औषधींच्या नावाखाली बनावट प्रकार होऊ लागले

छत्रपती संभाजीनगर : रुग्णांना बनावट गोळ्यांचे वाटप करणे हा त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. डॉक्टरांनी रुग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार उपचारासाठी दिलेली औषधेच बनावट असतील तर त्यांचे ‘साइड इफेक्ट’ रुग्णावर होणार आहेत. हा ‘साइड इफेक्ट’ बनावट गोळ्यांमध्ये कोणता कंटेंट वापरला त्यावरून समजेल, असा दावा औषधनिर्माणशास्त्रातील तज्ज्ञांनी केला. केंद्र शासनाने देशातील रुग्णांना ‘ट्रेड नेम’ऐवजी स्वस्तातील जेनेरिक औषधांचा पुरवठा सुरू केलेला आहे. त्या जेनेरिक औषधांमध्ये उच्च दर्जाचे कंटेंट असतात. मात्र, त्यासाठीच्या परवानग्या अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) घेणे बंधनकारक असते. उघडकीस आलेल्या प्रकारात चक्क बनावट औषधेच वापरली आहेत. हे अतिशय धक्कादायक असून, यंत्रणेला रुग्णांच्या जिवाशी पर्वा नसल्याचेच यातून दिसून येत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात वर्षभरात चार कंपन्यांनी बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे उघडकीस आल्यानंतर चौकशीत तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये बनावट गोळ्यांची पुरवठा केल्याचे स्पष्ट झाले. त्यात छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातही बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे बनावट गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारास ब्लॅक लिस्ट केलेले असताना त्याने दोन कोटींच्या निविदांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे शासकीय रुग्णालये, अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी आणि पुरवठादार यांच्यातील ‘सिंडिकेट’मुळे असे प्रकार घडत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. हे लोण खासगी डॉक्टरांकडे पसरलेले असू शकते, अशी शंकाही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

तज्ज्ञ काय म्हणतात?औषधींची नियमित तपासणी व्हावीशासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांची नियमित तपासणी व्हावी. आपल्या देशात औषधे दोन प्रकारांत तयार केली जातात. त्यात ट्रेड नेम आणि जेनेरिक असे प्रकार आहेत. दोन्ही प्रकारांत औषधांची निर्मिती करताना एफडीएकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर परवानगी घ्यावी लागते. मात्र, बनावटच औषधांचे वाटप झाले असेल तर ते अतिशय धक्कादायक आहे. हा रुग्णांच्या जिवाशी खेळला जाणारा प्रकार आहे.- डॉ. प्रवीण वक्ते संचालक, सिफार्ट विद्यापीठ

नक्कीच ‘साइड इफेक्ट’ होणारबनावट गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याचे उघडकीस येणे अतिशय धोकादायक आहे. बनावट गोळ्यांमध्ये कोणता कंटेट वापरला, हे तपासणे गरजेचे आहे. त्यामध्ये चुकीचा कंटेंट असेल आणि रुग्णांना दुसऱ्याच्या कंटेंटच्या औषधांची शिफारस डॉक्टरांनी केली असेल तर त्याचे साइड इफेक्ट नक्कीच होतात. अधिक तपासणी केल्यास बनावट गोळ्या दिलेल्या रुग्णांवर ‘साइड इफेक्ट’ झालेले असतील.- डॉ. बापू शिंगटे, संशोधक, रसायनशास्त्र, विद्यापीठ

प्रत्येक टप्प्यावर तपासणी होतेकोणत्याही औषधांची निर्मिती करताना त्याची प्रत्येक टप्प्यावर एफडीएकडून तपासणी केली जाते. औषधे तयार होत असताना एफडीएचे लक्ष असते. मात्र, त्या प्रक्रियेशिवाय औषधे तयार करून त्यांचे वाटप केले असेल तर ते धोकादायक आहे. एवढेच काय, औषधे बनविणाऱ्या कंपनीलाही एफडीएकडूनच मान्यता घ्यावी लागते. औषधांत कोणता कंटेंट वापरला जातो, त्यांचे ‘साइड इफेक्ट‘ काय, याचीही तपासणी एफडीए करीत असते.- डॉ. जयप्रकाश संगशेट्टी, संशोधक, औषधनिर्माणशास्त्र

टॅग्स :medicineऔषधंchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य