रामेश्वर काकडे, नांदेडकेळीची लागवड जून, जुलै व आॅक्टोबर या तीन महिन्यांत केल्यास सर्वाधिक उत्पादन मिळते, असा निष्कर्ष नांदेड येथील केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सतत तीन वर्षे केलेल्या संशोधनाअंती काढला आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत नांदेड येथील केळी संशोधन केंद्राच्या डॉ. एस. व्ही.धुतराज व प्रा.आर.व्ही.देशमुख या शास्त्रज्ञांनी मागील तीन वर्षांपासून केळी लागवडीवर प्रयोग केला आहे. प्रयोगाअंती लागवडीची शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे. केळीच्या अर्धापुरी तसेच ग्रॅन्डनैन या वाणाचे जास्तीत जास्त उत्पादन व आर्थिक लाभ मिळण्यासाठी लागवड जून अथवा जुलै महिन्यामध्ये करण्याची शिफारस मराठवाडा विभागासाठी करण्यात आली आहे.जून महिन्यामध्ये केळी लागवड केल्यास ७७.७ मेट्रिक टन उत्पादन निघाले असून खर्च वजा जाता निव्वळ ७ लाख २०४७५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीचे हेक्टरी ७७.७ मेट्रिक टन उत्पादन निघाले. खर्च वजा जाता निव्वळ ६ लाख २६५०० रुपये उत्पन्न मिळाले. तर आॅक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर हेक्टरी ६९.४ मे.टन उत्पादन निघाले असून यातून ५ लाख ९२७५० रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. यासाठी शेतकऱ्यांनी विशेषता जून, जुलै व आॅक्टोबर या महिन्यात लागवड करावी, जेणेकरुन उत्पादन जास्त निघून दरही चांगले मिळाले आहेत.लागवडीपूर्व मशागत जमीन लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करुन दोन-तीन वेळा वखरणी करावी, मोठी ढेकळी असतील तर रोटाव्हेटरच्या सहाय्याने बारीक करुन जमीन भुसभुशीत करावी. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे, निचरा कमी आहे त्या शेतीमध्ये आधी धैंचा पेरावा आणि ४५ दिवसानंतर धैंचा जमिनीमध्ये गाडावा त्यानंतर लागवड करावी. त्यानंतर एक हजार रोपासाठी पाच ते सहा ट्रॉली शेणखत वापरावे. केळीसाठी जमीन चांगली तापलेली व मोकळी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ज्या अंतरावर केळी लागवड करावयाची आहे, त्याच्या दोन महिने अधिच सऱ्या पाडण्याचे काम करणे योग्य ठरते.केळीच्या जातीमराठवाड्यात प्रामुख्याने नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये अधापुरी व ग्रॅन्डनैन या जातीची लागवडीसाठी निवड केली जाते. या वाणाचा वापर वाढत आहे. ऊतीसंवर्धन रोपे तयार करण्यासाठी मातृवृक्षाची निवड करावी लागते. त्यासाठी वेगळÞे असे मातृरोपवाटिकेचे क्षेत्र असावे व असे क्षेत्र कीड व रोगमुक्त असावे. सरासरी २५ ते ३० किलो वजनाचा घड असलेल्या झाडाचे मुनवेच वापरलेले असावे. ऊतीसंवर्धित रोपांची लागवडरोपे लागवडीच्या आदल्यादिवशी ठिबक सिंचन संच चालवून जमीन ओली करुन घ्यावी व वाफसा स्थिती निर्माण झाल्यावर लागवड करावी.रोपांची लागवड पावसाळ््यात दिवसभर करता येते, परंतु अन्य हंगामात लागवड करताना दुपारी तीन वाजेनंतरच करावी. सर्वप्रथम रोपांची पिशवी हातामध्ये घेवून त्यातील माती हाताने काढावी, जेणेकरुन रुटबॉल फुटणार नाही. त्यानंतर डाव्या हाताच्या रोप मातीसह अलगद काढून घ्यावे. मातीच्या गोळ््यासह रोप एक बाय एक बाय एक फूट आकाराच्या खड्ड्यामध्ये अथवा सरीमध्ये ठेवावे. सोबत १० ग्रॅम प्रतिझाड फोरेट टाकावे.लागवडीसाठीचे हवामानकेळी हे उष्ण व कटीबंधीय पीक असून त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणत: केळी पिकास १२ ते ४० अंश तापमान चांगले ठरते.जमिनीची निवडज्या जमिनीमध्ये केळी लावायची आहे त्या जमिनीच्या प्रतीवर उत्पादन अवलंबून आहे. केळीसाठी जमीन भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीची पोयटायुक्त आणि सेंदिय कर्ब असलेली व ६ ते ७.५ सामू असलेली जमीन योग्य असते.क्षारता ०.०५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. नदीकाठची, क्षारयुक्त, चोपण जमिनीमध्ये केळीची लागवड करु नये.लागवडीचा हंगाम ऊतीसंवर्धन केळीची लागवड अतिउष्णतेचा कालावधी आणि अतिथंडीचा कालावधी सोडून वर्षभर करता येते. परंतु बाजारभावाचा विचार करुन लागवड करणे फायद्याचे ठरते.
केळी लागवड केल्यास जास्त उत्पादन
By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST