शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आई देवाघरी गेल्याचे चिमुकल्या मुलींना उमगलेच नाही...!

By admin | Updated: June 21, 2016 01:12 IST

औरंगाबाद : महिनाभरानंतर आई आजारपणातून बरी झाली होती...दुपारी माझ्यासोबत बोललीही...सायंकाळी मात्र काही बोलत नव्हती.

औरंगाबाद : महिनाभरानंतर आई आजारपणातून बरी झाली होती...दुपारी माझ्यासोबत बोललीही...सायंकाळी मात्र काही बोलत नव्हती. त्यामुळे रात्रभर आईजवळ बसून होते. सकाळीही आई बोलत नसल्याने शाळेत जाऊन सरांना सांगितले. तेव्हा सगळे सर घरी आले. आई देवाघरी गेल्याचे त्यांनी सांगितले. बालवयात मातृछत्र हरवलेल्या दोन चिमुकल्यांंना हे सांगताना अश्रू आवरणे कठीण झाले होते. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ त्यांचे घर आहे.संगीता राजू निसर असे या मयत मातेचे नाव आहे, तर अनिता आणि सुशीला अशी या दोन चिमुकलींची नावे आहेत. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. अशा परिस्थितीत आईने काबाडकष्ट करून मुलींना वाढविले. परंतु आईच्या उपचारासाठी अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ या दोन बहिणींवर आली. महिनाभरापूर्वी उपचारासाठी त्यांनी आईला घाटीत दाखल केले. या चिमुकलींवर ओढवलेल्या या प्रसंगाविषयी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आल्यानंतर अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. उपचारानंतर आईला घेऊन घरी आले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा घाटीत गेले. तेव्हापासून आईला बरे वाटत होते, असे अनिताने सांगितले. परंतु रविवारी सायंकाळी आई अचानक शांत झाली. आईला काय झाले, हे मुलींना कळत नव्हते. त्यामुळे मुली रात्रभर आईजवळच बसून होत्या. आई सोडून गेली, याची कल्पनाही त्यांना नव्हती.सोमवारी सकाळीदेखील आई उठली नसल्याचे अनिताने शाळेच्या मुख्याध्यापिका टी.ए. देशमुख (मॉडर्न कन्या विद्यालय, गारखेडा) यांना सांगितले. देशमुख यांनी शिक्षक प्रा.शेषराव जाधव, शेख शफिक, जितेंद्र शिसोदे, एकनाथ मोटे यांना तिच्या घरी पाठविले. तिच्या आईचे निधन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत घरी तिची आजी, मावशी आल्या होत्या. हलाखीच्या परिस्थितीमुळे अंत्यविधी कसा करावा, असा प्रश्न उभा राहिला. अनेकांनी मदतीसाठी पुढाक ार घेतला. मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यविधी झाला. नातेवाईकांची परिस्थिती बेताचीच आहे. चांगल्या भविष्यासाठी दोन्ही बहिणींची बालगृहात व्यवस्था केली जाणार असल्याचे बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड.रेणुका घुले यांनी सांगितले.नियतीचा खेळज्या आईने वाढविले, स्वत: खस्ता खाल्ल्या, शिक्षण दिले, त्या आईला खांदा देण्याची वेळ येईल, असा विचारही कधी या चिमुकल्यांच्या मनात आला नसेल. परंतु नियतीने हा प्रसंग आणला. हे पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.