शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

अडथळ्यांची शर्यत; प्रकल्प अहवालाचे काम रखडले

By admin | Updated: November 14, 2015 00:54 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद स्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे; परंतु मनपाने विकासासाठी कोणते मॉडेल स्वीकारायचे हेच अद्याप निश्चित केलेले नाही.

सुनील कच्छवे , औरंगाबादस्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे; परंतु मनपाने विकासासाठी कोणते मॉडेल स्वीकारायचे हेच अद्याप निश्चित केलेले नाही. त्यामुळे प्रकल्प अहवालाचे काम रखडले आहे. त्याचा फटका आगामी काळात निवड प्रक्रियेत बसविण्याची भीती व्यक्त होत आहे.केंद्र सरकारने देशभरातील निवडक शहरांचा दर्जा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान सुरू केले आहे. या अभियानाकरिता सरकारने औरंगाबादसह देशभरातील शंभर शहरांची निवड केली आहे. आता यातून पहिल्या वर्षी २०, दुसऱ्या वर्षी ४० आणि तिसऱ्या वर्षी ४० शहरांची निवड केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीत निवडलेल्या शहरांना केंद्राकडून सलग पाच वर्षे भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शंभर शहरांकडून पहिल्या वर्षी निवड होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. औरंगाबाद मनपाने प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नाईट फ्रँक-फोट्रेस नावाची पीएमसी नियुक्त केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार पीएमसीने आॅक्टोबर महिन्यात शहरातील जनतेशी संवाद साधून कच्चे आराखडे तयार केले. स्मार्ट सिटीच्या विकासासाठी केंद्र सरकारने नवीनीकरण, पुनर्निर्माण आणि हरित क्षेत्र विकास, असे तीन मॉडेल ठरवून दिलेले आहेत. मनपाला यापैकी एक मॉडेल निश्चित करून त्यानुसार प्रकल्प अहवाल सादर करायचा आहे. पीएमसीने तिन्ही मॉडेल डोळ्यासमोर ठेवून काही कच्चे आराखडे बनविले आहेत. आता मनपाच्या सर्वसाधारण सभेने कोणते मॉडेल स्वीकारायचे हे ठरविल्यानंतर त्या प्रकारातील एका कच्च्या आराखड्यावर काम केले जाणार आहे; परंतु अद्याप मॉडेलच निश्चित झालेले नसल्यामुळे प्रकल्प अहवालाचे काम रखडले आहे. राज्य सरकारकडे प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत २९ नोव्हेंबर आहे, तर केंद्राकडे हा अहवाल १५ डिसेंबरपर्यंत सादर करायचा आहे. कमी कालावधी राहिल्यामुळे आता एवढ्या मुदतीत चांगला अहवाल सादर करणे तसेच तो केंद्र स्तरावर इतर शहरांच्या तुलनेत टिकणे कठीण होणार आहे. अहवालावरच ठरणार निवडकेंद्र सरकार यंदा शंभर शहरांमधून २० शहरांची निवड करणार आहे. ही निवड या शहरांच्या प्रकल्प अहवालांवरून होणार आहे. हा अहवाल तयार करताना किमान दहा टक्के लोकांची मते विचारात घेण्याची अटही केंद्राने घालून दिली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत अवघ्या साडेपाच हजार लोकांचीच मते पीएमसीकडे नोंदविली गेली आहेत. हे प्रमाण एक टक्काही नाही. आता कच्च्या आराखड्यावर जास्तीत जास्त लोकांची मते नोंदवून घेणे गरजेचे आहे; परंतु त्यासाठी पीएमसीकडे पुरेसा वेळ असणार नाही. मॉडेल निवडीवरून आयुक्त, पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद...स्मार्ट सिटीच्या विकासासाठी तीनपैकी एक मॉडेल निश्चित करायचे आहे. हा निर्णय मनपाला घ्यायचा आहे. मनपा आयुक्त प्रकाश महाजन हे हरित क्षेत्र विकासाच्या मॉडेल निवडण्याच्या बाजूने आहेत. यामध्ये शहराबाहेर किमान २५० एकर मोकळ्या जागेत नवीन शहर वसविणे अपेक्षित आहे. यामध्ये अडथळा उभा राहणार नसल्यामुळे हे मॉडेल निवडणे योग्य होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे, तर मनपातील पदाधिकारी पुनर्विकास मॉडेलला अनुकूल आहेत. पीएमसीने तीन आठवड्यांपूर्वी मनपात सादरीकरण केले. तेव्हा बहुतेक पदाधिकाऱ्यांनी मिल कॉर्नरजवळील ५० एकर जागेचा पुनर्विकास करणे सोयीचे होईल, अशी आशा व्यक्त केली.