शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

औरंगाबादेत टँकरची शंभरी

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील पावणेदोनशे गावांना सध्या पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या १०० वर पोहोचली आहे. टंचाईग्रस्त गावांपैकी ६६ गावांना १०७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जानेवारीपासूनच जिल्ह्यात काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली. मात्र, आता त्याची तीव्रता वाढली आहे. दररोज नवनवीन गावे पाणीटंचाईच्या फेर्‍यात येत आहेत. विशेषत: पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांत पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. या तीन तालुक्यांमध्ये सध्या शंभर गावे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद, कन्नड आणि सिल्लोड तालुक्यांतही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावे आणि त्यांना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या संख्येत बरीच भर पडली आहे. चालू आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या पावणेदोनशेवर पोहोचली आहे. तर पाणीपुरवठ्याच्या टँकरच्या संख्येने शंभरी गाठली. सध्या जिल्ह्यात अधिक तीव्र पाणीटंचाई जाणवणार्‍या ६६ गावांना १०७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उर्वरित गावांमध्ये जवळपासच्या विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात पैठण तालुक्यात सर्वाधिक ३५ टँकर सुरू आहेत. सोयगाव आणि खुलताबाद या तालुक्यांमध्ये मात्र, अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. जिल्ह्यात प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना पाणी देण्यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यात १४१ गावांमध्ये एकूण १६४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यातील ३३ विहिरी पाणीपुरवठ्याचे टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. मराठवाड्यात आजघडीला २५१ टँकर सुरू आहेत. यामध्ये औरंगाबादमध्ये सर्वाधिक १०७ टँकर आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ५२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय जालना जिल्ह्यात ४ आणि नांदेड जिल्ह्यात ३ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील टँकर संख्या तालुकाटँकर औरंगाबाद१३ फुलंब्री०४ पैठण३५ गंगापूर१९ वैजापूर३० कन्नड०२ सिल्लोड०४ एकूण१०७