शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

‘सरकारला अजून किती आत्महत्या हव्यात आहेत ?’

By admin | Updated: November 16, 2014 23:40 IST

बीड : संपूर्ण मराठवाड्यात पीक पाण्याची अतिशय वाईट स्थिती आहे. पाणी नाही, पिके गेली आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे.

बीड : संपूर्ण मराठवाड्यात पीक पाण्याची अतिशय वाईट स्थिती आहे. पाणी नाही, पिके गेली आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे. अशी सारी परिस्थिती असताना भाजपाचे सरकार मात्र दुष्काळ जाहीर करीत नाही. हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहणार आहे? असा सवाल विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी केला.ते रविवारी जिल्ह्याचा दुष्काळ पाहण्यासाठी आले होते. त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुरंदरचे आ. विजय शिवतरे, आ. सदा सरवदे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले की, बीड जिल्ह्यात सिंचनाचा मोठ्याप्रमाणात अभाव आहे. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत झाली पाहिजे. मदतीच्या दुष्टीकोनातून राज्य सरकार कुठलीच पावले उचलत नसल्याचे पहावयास मिळत आहे. शासनाने अद्याप पर्यंत जनावरांच्या चाऱ्याची देखील व्यवस्था केलेली नाही. दोन दिवसापुर्वी शासनाने आणेवारी काढली. ही आणेवारी बोगस आहे. ब्रिटीश कालीन पध्दतीने ही आनेवारी काढली जात आहे. आणेवारी काढण्याची पध्दत बदलून नवीन पध्दत लागू करावी, अशी मागणी करत शिंदे पुढे म्हणाले की, मी बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, येथील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असते. मात्र हे सरकार दुष्काळ निवारणासाठी कुठलेच ठोस पावले उचलत नाही असा आरोप शिंदे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब अंबूरे, सचिन मुळूक, पं. स. सदस्य विलास महाराज शिंदे, पंकज कुटे, विपुल पिंगळे, सुशील पिंगळे आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)