शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

४२ लाख प्रमाणपत्रांचे घरपोच वाटप

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

करमाड : महाराष्ट्र शासनाने सर्व सामाजिक योजना एका छत्राखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात

करमाड : महाराष्ट्र शासनाने सर्व सामाजिक योजना एका छत्राखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करमाड येथे आयोजित महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनाप्रसंगी केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, शासनाने सर्व शासकीय लाभांच्या योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या ४ वर्षांत पाणंदमुक्ती अभियान रस्ते तयार झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे-येणे सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणात कुठल्याही दाखल्याची अडचण येऊ नये यासाठी यावर्षी इयत्ता ९ वी पर्यंतच्या ४२ लाख प्रमाणपत्रांचे घरपोच वाटप करण्यात आले आहे, तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात १ कोटी ६० लाख प्रमाणपत्र वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले. महा-ई-सेवा केंद्रामुळे ग्रामीण भागात ७/१२, नमुना नं. ८ व इतर प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत. आ. काळे यांनी विकासाच्या दृष्टीने पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठवाड्याच्या दुष्काळाबाबत मी तुमची मागणी मंत्रिमंडळासमोर मांडतो, असे आश्वासन दिले. यावेळी आ. डॉ. कल्याण काळे यांनी येत्या १५ आॅगस्टला औरंगाबाद शहर व ग्रामीणसाठी वेगवेगळ्या तहसीलची घोषणा करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री थोरात यांनी दीपप्रज्वलन करून केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी बाप्पासाहेब थोरात यांनी केले. समाधान योजनेबाबत जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. करमाड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंच कैलास उकर्डे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदाताई जारवाल, विलास औताडे, अभिजित देशमुख, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बबनराव कुंडारे उपस्थित होते. (वार्ताहर)