शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहांची चौकशी होणार

By admin | Updated: June 14, 2017 00:28 IST

नांदेड : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या वसतिगृहांची परिपूर्ण चौकशी करून सदर अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या वसतिगृहांची परिपूर्ण चौकशी करून सदर अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी दिले आहेत़ जिल्हा परिषदेत मंगळवारी समाजकल्याण समितीची बैठक सभापती शीला निखाते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ या बैठकीत प्रांरभी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला़ या आढाव्यात शासनाच्या सर्व योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत असेही सभापतींनी सुचित केले़ त्याचवेळी जिल्ह्यात समाजकल्याण विभागाचे जवळपास २०० वसतिगृह चालतात़ या वसतिगृहांची नेमकी अवस्था समोर येण्यासाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांनी सर्व वसतिगृहांची परिपूर्ण तपासणी करावी़ त्यामध्ये विद्यार्थीसंख्या, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, भौतिक अवस्था आदी सर्व बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे़ त्याचवेळी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ पावसाळ्याची परिस्थिती लक्षात घेवून ज्या गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे अशा गावांमध्ये आऱ ओ़ प्लॅन्ट बसविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी असेही त्या म्हणाल्या़ आगामी शैक्षणिक वर्षात वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत रोपटे देऊन करावे अशी अभिनव सूचनाही सभापतींनी दिली़ या बैठकीस समिती सदस्या भाग्यश्री साबणे, संगीता वारकड, संगीता अटकोरे, विजयश्री कमठेवाड, शकुंतला कोलमवाड, सुंदराबाई मरखेले, चंद्रसेन पाटील, गंगाप्रसाद काकडे, समाजकल्याण अधिकारी नागोराव कुंभारगावे आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, याच बैठकीत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याचा सभापती निखाते व समिती सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़दरम्यान, या सभेत जि.प.च्या दलित वस्ती निधीबाबत चर्चा न झाल्याने मावळत्या सभागृहातील सदस्यांची निराशा झाली़ जिल्हा परिषदेच्या तब्बल २२ कोटींच्या कामांना पालकमंत्री खोतकर यांनी स्थगिती दिली आहे़ जि़प़ ने या कामांना क्लिनचीट दिली असली तरी अद्यापही पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठली नसल्याने त्या कामाचे काय याकडे उत्सुकता लागली आहे़