शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाच्या प्रवेशाचा घोळच घोळ

By admin | Updated: August 14, 2014 01:55 IST

गजानन वानखडे , जालना जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये सुरु होऊन दोन महिने उलटले. परंतु समाज कल्याण विभागासह खाजगी एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे शासकीय वसतिगृहातील शेकडो

गजानन वानखडे , जालनाजिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये सुरु होऊन दोन महिने उलटले. परंतु समाज कल्याण विभागासह खाजगी एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे शासकीय वसतिगृहातील शेकडो विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्णत: रखडली आहे.जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे एकूण ९ शासकीय वसतिगृह आहेत. त्यात मुलांचे ६ आणि मुलींच्या ३ वसतिगृहांचा समावेश आहे. या वसतिगृहात एससी, एसटी, ओबीसी, आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जात आहे. जिल्ह्यात बदनापूर, घनसावंगी, अंबड, भोकरदन येथील या वसतिगृहांच्या प्रवेश प्रक्रियेकरीता गुणवत्तेनुसार आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. प्रवेश प्रक्रिया २३ जून ते १० आॅगस्ट पर्यंत राबविण्यात आली. जिल्ह्यातील ७५५ जागेसासाठी ११०७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईनद्वारे अर्ज दाखल केले. समाज कल्याण विभागाने गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाईल, हे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणेच अर्ज मागविल्या नंतरची संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. अर्ज दाखल केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनीही ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन यादी आज न उद्या प्रसिध्द होईल म्हणून प्रतीक्षा सुरु केली. सरकारी यंत्रणेने १३ आॅगस्ट रोजी अंतिम यादी जाहीर होईल, असे स्पष्ट केले. पुन्हा याच यंत्रणेने घुमजाव करीत १३ ऐवजी १९ आॅगस्ट रोजी यादी जाहीर करु, अशी घोषणा केली. वास्तविकता शाळा महाविद्यालय सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी आॅनलाईन प्रक्रिया पूर्णत: रखडली आहे. पुण्याच्या मास्टेक कंपनीचे सॉफ्टवेअर अद्यापही अद्यावत न झाल्याने पात्रता यादीच झळकली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्तापर्यत शालेय विद्यार्थ्यांचे ११९ अर्जापैकी शहरासह तालुक्याच्या वसतिगृहात फक्त ३३ विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील समाजकल्याणची विभागाच्या वसतिगृहाची या वर्षीपासून आॅनलाईन प्रक्रिया करण्याचे ठरले. त्यानंतर पुण्याच्या मास्टेट कंपनीला याची सर्व जबाबदारी देण्यात आली परंतु विभागाच्या बेवसाईट अपडेट नसल्याने किती विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले? त्यातील गुणानुक्रम कसा? याची काहीच माहिती विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कळाली नाही. परिणामी विद्यार्थ्यासह पालकवर्गात नाराजीचे वातावरण आहे.आपला प्रवेश निश्चित आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी जिल्ह्यातील पालक रोज समाजकल्याण उपायुक्त कार्यालयात चकरा मारत आहेत.परंतु आॅनलाीईनची सर्व माहिती डायरेक्टर समाजकल्याण पुणे यांच्याकडे पाठविण्यात आल्याने स्थानिक अधिकारी वरिष्ठांकडे बोट दाखवून हात वर करीत आहेत.जिल्ह्यात वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया ७५५ पर्यंंत क्षमता आहे त्यामंध्ये आधीच प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३९ आहे. त्यामुळे जिल्ह्यात फक्त ४१६ जागा शिल्लक आहे. ११०७ आलेल्या अर्जापैकी शालेय विद्यार्थ्याचे ११९ अर्ज आले होते, त्यापैकी फक्त ३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित विद्यार्थ्याना प्रतीक्षा आहे.उर्वरित विद्यार्थ्यांना कॉललेटर पाठाविण्यात आले आले असल्याचे समाजकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.