यावेळी संस्थेच्या पश्चिम विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील १५ सीएनीं एकत्र येत मागील दोन वर्षांपासून 'फॉलो यूवर ड्रिम्स' हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात शुक्रवार आणि शनिवारी हे १५ जण विविध शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील संधींची माहिती देतात. कोविड काळात या युवकांनी शाळांशी संपर्क साधून ऑनलाईन मार्गदर्शन दिले आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात १५ जणांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए मनिष गादिया, उपाध्यक्ष दृष्टी देसाई, सचिव अर्पित काबरा, कोषाध्यक्ष जयेश काला, विकासाचे अध्यक्ष यशवंत कासार, भारताच्या अप्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर चितळे, औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष पंकज सोनी, सीए उमेश शर्मा आणि रोहण आचलिया यांच्या उपस्थित करण्यात आला. १५ जणांमध्ये सीए सुचित शेटे, मारोती गिरी, गणेश विरेश्वर, रविंद्र शिंदे, हरी दरक, कुणाल काबरा, रमेश शेटे, विश्वास सोमवंशी, दीपक राऊत, सौरभ कुलकर्णी, राजेश मालू, विजय क्षीरसागर, आनंद चिरकुटकर, महेश कदम आणि बद्रीनाथ खरात यांचा समावेश आहे. या १५ जणांनी आतापर्यत अडीच हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
फाेटो कॅप्शन : 'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटस ऑफ इंडिया' औरंगाबाद शाखेच्या वर्धापनदिनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या १५ सीएसमवेत संस्थेचे पदाधिकारी.