विभागात २९ हजार नागरिक क्वारंटाईन
औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या २९ हजार ६६५ नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आहेत. यात औरंगाबादमध्ये १०३००, जालन्यात २७७२, परभणीत २२२८, हिंगोलीत १३३५, नांदेडमध्ये ५१५४, बीडमध्ये ३३९३, लातुरात ४२६६ तर उस्मानाबादमध्ये ३९५९ नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात कंटेन्मेंट झोन वाढले
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कंटेन्मेंट झोनची संख्या ग्रामीण भागात वाढत आहे. २२४२ झोन ग्रामीण भागात सध्या आहेत. तर चार मनपा हद्दीत २५७ झोन आहेत. सध्या विभागात २४९९ झोन आहेत.
१५ लाख नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी
औरंगाबाद : विभागात आजवर सुमारे १५ लाख नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २ लाख ६९ हजार ७४३ जणांना कोरोनाची लागण झाली. १८.७३ टक्के पॉझिटीव्हीटी दर असल्याचे यातून निष्पन्न झाले आहे.
अॅंटिजेनचा पॉझिटीव्हीटी दर १२.३१ टक्के
औरंगाबाद : मराठवाड्यात १७ लाख ३२ हजार ९६६ अॅंटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून २ लाख १३ हजार ४०८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. १२.३१ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर असल्याचे प्रशासनाने अहवालात म्हटले आहे.