शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

अपहृत मुलगा सोलापुरातून ताब्यात

By admin | Updated: March 15, 2015 00:38 IST

उस्मानाबाद : शहरातील बार्शी नाका परिसरातून अपहरण झालेला मुलगा उस्मानाबाद व सोलापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा दाखल झाल्यापासून दोन दिवसात स्वगृही परतला आहे़

उस्मानाबाद : शहरातील बार्शी नाका परिसरातून अपहरण झालेला मुलगा उस्मानाबाद व सोलापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा दाखल झाल्यापासून दोन दिवसात स्वगृही परतला आहे़ ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास शहरातील बार्शी नाका परिसरात घडली होती़ मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बार्शी नाका परिसरातील यशवंतनगर भागात राहणारा ज्ञानेश्वर कुंडलीक गायकवाड (वय-१६ रा़ बरमगाव बु़) हा दहावीत शिक्षण घेत आहे़ तो आजीसोबत रूम करून राहत होता़ ज्ञानेश्वर हा बुधवारी दुपारी गावाकडे जायचे म्हणून आजीला सांगून घराबाहेर पडला होता़ मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा पत्ता लागला नाही़ तो गावाकडेही आला नसल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली़ त्यांनतर गुरूवारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांनी ज्ञानेश्वर याचे अपहरण केल्याची फिर्याद कुंडलिक शिवराम गायकवाड यांनी दिली होती़ तपासाधिकारी पोउपनि विशाल शहाणे यांनी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, पोनि डी़एम़शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेची माहिती राज्यातील इतर पोलीस ठाण्यांना दिली. शनिवारी सकाळी सोलापुरातील शिवाजी चौकात संशयितरित्या फिरणाऱ्या ज्ञानेश्वरला सोलापूर येथील पोना सोनार यांनी पाहिले़ त्यांनी चौकशी केली असता, आपल्याला ट्रकमध्ये घालून काही लोकांनी आणल्याचे त्याने सांगितले़ सोनार यांनी पोउपनि शहाणे यांच्याशी संपर्क साधला़ त्यानंतर सोनार यांनी त्याला सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले़ तेथून ज्ञानेश्वरला ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे़ कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला त्याच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले़ मुलगा घरी परतल्यानंतर त्याच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते़ (प्रतिनिधी)