शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

साडेतीन कोटी खर्चूनही गळती थांबेना

By admin | Updated: May 20, 2014 01:07 IST

प्रकाश मिरगे, जाफराबाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ‘मॅजिकशो’, ‘रोड शो’ संपले असून शहरातील ‘वॉटर शो’ चे आता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रकाश मिरगे, जाफराबाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ‘मॅजिकशो’, ‘रोड शो’ संपले असून शहरातील ‘वॉटर शो’ चे आता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाफराबाद शहरामध्ये राज्य मॉडेल म्हणून ओळख असलेली जाफराबाद पाणीपुरवठा योजना पूर्णत: बिनकामी ठरत आहे. या योजनेसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. तरीही सदरील योजनेला कायम गळती लागलेली आहे. योजनेला आजारपणातून सावरण्यासाठी परत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने लाखो रुपयांचे वाढीव प्रस्ताव सादर करुन मंजूर करुन घेतले आहेत, हे विशेष! विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी ते तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत गेल्या निवडणुकीमध्ये घरची भाकरी खाऊन मोठी मेहनत घेतल्याचे सांगत आहे. अशीच मेहनत शहरातील पाणी टंचाई समस्याविषयी घ्यावी, असे वाटणे साहजिकच आहे. उन्हाळा असो की पावसाळा; जाफराबादकरांचा पाणीटंचाईच्या भीतीने नेहमीच अंगावर काटा येतो. तसा नेत्यांच्या अंगावरही काटा येतो. परंतु तो निवडणुकीतील काळापर्यंतच. नेतेमंडळी आपली तहान कशीतरी भागवतात. नागरिकांना मात्र आपली तहान दररोज पैसे मोजून भागवावी लागत आहे. याचे कोणतेही सोयरसुतक प्रशासनास अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींना नसल्याचे चित्र आहे. गेल्या आर्थिक वर्षात तालुक्यात पावसाने वार्षिक उच्चांक गाठून सरासरी पेक्षाही दुपटीने पाऊस पडला आहे. तरी सुध्दा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नवीन योजना कार्यान्वित होऊन एक वर्ष होत आहे. परंतु पूर्णा नदीच्या पात्रातून (खडकपूर्णा) येणारा पाणीपुरवठा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचतच नसल्याचे सध्याचे चित्र आहे. अंतर्गत पाणीपुरवठा जलवाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे खरे कारण आहे. जलशुध्दीकरण केंद्राची देखील अशीच काही अवस्था होऊन बसली आहे. यातून होणारा पाणीपुरवठा अत्यंत दूषित होत असून सदरील पाणीपुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी हस्तांतरित कराव्ी असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणी पुरवठा योजनेमध्ये काही त्रुटी असतांना ग्राम पंचायत पदाधिकार्‍यांची भूमिकाही संशयास्पदच वाटत आहे. राज्यात आदर्श ठरलेली पाणीपुरवठा योजना कुचकामी गतवर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खडकपूर्णा जलाशयातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. ही योजना राज्यात आदर्श अशी ठरली होती. या योजनेमुळे जाफराबादेतील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपणार अशी आशा निर्माण झाली होती. असे असूनही ही योजना अत्यंत कुचकामी ठरली आहे. जाफराबादवासियांना बारमही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. साडेतीन कोटी रुपये खर्च करुनही उपयोग काय, असा सवाल सर्व सामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. योजनेची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.