शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या मदतीने पतीस पेटविले

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

तामलवाडी : ‘तू माझ्या बहिणीला मारहाण का करतोस’ अशी कुरापत काढून पत्नी व तिच्या भावाने नवऱ्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देवून पसार झाले.

तामलवाडी : ‘तू माझ्या बहिणीला मारहाण का करतोस’ अशी कुरापत काढून पत्नी व तिच्या भावाने नवऱ्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देवून पसार झाले. यामध्ये ३५ वर्षीय पती भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) येथे १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली. जखमीच्या जबाबानंतर तामलवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी दोघांविरूद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १० सप्टेंबर रोजी यातील जखमी राजेंद्र कच्चू वडवराव (वय ३५) हा घरासमोर बसला असता, बायकोचा भाऊ तिथे आला. ‘तू माझ्या माझ्या बहिणीला का मारतोस व सतत मारहाण का करतोस’ असे विचारून विटाने मारहाण केली. त्यानंतर राजेंद्रची पत्नी वर्षा हिने घरातील रॉकेलची कॅन आणली व ती भाऊ जगन शेरखाने याच्या हातात दिली. वर्षा हिच्या आदेशानंतर जगनने राजेंद्रच्या अंगावर रॉकेला टाकून त्याला पेटवून दिले. यात तो भाजला आहे. घटनास्थळावरून दोघे बहिण-भाऊ पसार झाले. या घटनेनी माहिती मिळताच जखमीची बहिण शितल कांबळे व इतरांनी शाल टाकून राजेंद्रला विझविले. जखमी राजेंद्रवर प्रथम तुळजापूर रुग्णायात उपचार केले. नंतर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी राजेंद्र वडवराव (रा. मसला खु.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वर्षा (पत्नी) व तिचा भाऊ जगन अण्णा शेरखाने (रा. राळेरास, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सपोनि मिर्झा बेग करीत आहेत. (वार्ताहर)