शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिली मदत

By admin | Updated: September 3, 2014 01:11 IST

बीड: गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतो. मात्र गोळा केलेली वर्गणी समाजिक कार्यास देण्यास कोणीही पुढे येत नाही़ याला अपवाद ठरलेत परळी तालुक्यातील पोहनेर येथील तीन गणेश मंडळ.

बीड: गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतो. मात्र गोळा केलेली वर्गणी समाजिक कार्यास देण्यास कोणीही पुढे येत नाही़ याला अपवाद ठरलेत परळी तालुक्यातील पोहनेर येथील तीन गणेश मंडळ. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना एक लाख रुपयांची मदत देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. परळी-बीड रस्त्यावरील नाथ्रा फाटा येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी घडली होती़ पोहनेर येथील सखाराम (राजाभाऊ) धोंडिबा गात (वय २७) यांच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला होता़ घरातील कर्ताव्यक्ती अचानक निघून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबांवर संकटच कोसळले़ त्यामुळे सिरसाळा पोलीस ठाण्याचे बीट जमादार आऱबी़ सिरसट यांनी गात यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याचा निर्धार व्यक्त केला़ त्यावेळी गणेश उत्सवाच्या वर्गणीला सुरुवात झाली होती़ त्यामुळे सिरसट यांनी गावातील तीन गणेश मंडळांच्या अध्यक्षांसोबत गात कुटूंबियाना आर्थिक मदत देण्याबाबात चर्चा केली़यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला़ गणेश मूर्ती स्थापना करताना कोणाताही गाजावाजा केला नाही़ यासाठी लागणारा खर्च मंडळांनी राखून ठेवला. वर्गणीतील सर्व रक्कम गात कुटूंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)पोहनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितत राजेभाऊ गात यांची आई रुक्मिणबाई गात व मुलीच्या नावे पन्नास हजार रुपयांची एफडी व त्यांची पत्नी जयश्री व मुलगी यांच्या नावे पन्नास हजार रुपयांची एफडी करण्यात येणार असल्याचे मंगळवारी कार्यक्रमात जाहीर झाल्यानंतर त्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले़ यावेळी आऱपी़ सिरसट, सपोनि एऩएम़ शेख, सपोनि छबु सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष बाजीराव काळे, चक्रधर गणेश मंडळाचे अध्यक्ष बापूराव काकडे व शेतकरी गणेश मंडळाचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनीही एक लाख रुपयांची मदत केली़ कार्यक्रमास उपसरपंच विष्णू रोडगे, ग्रामसभा सदस्य अनिल देशमुख, पोलीस पाटील अशोक काकडे, जलील कुरेशी, नारायण हटके, राजेंद्र देशपांडे, राजेभाऊ पवार, शिवाजी काकडे, पवन देशमुख, अजय देशमुख, मुकुंद देशमुख यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती़