शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

कामगारांना ३ हजारांची मदत

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

जालना : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध वस्तूऐवजी रोख ३ हजार रूपये रक्कम दिली जाणार आहे.

जालना : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध वस्तूऐवजी रोख ३ हजार रूपये रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी कामगार विभागाकडून जिल्ह्यातील कामगारांसाठी १ कोटी ४७ लाख ९३ हजार रुपयांची तरतूद केली आहे. याचा फायदा जिल्ह्यातील ४ हजार ९३१ कामगारांना होणार आहे.कामगारांना मच्छरदाणी, ब्लँकेट, चादर, जेवणाचा डबा, चटई अशा अनेक वस्तू खरेदीसाठी ही रक्कम दिली जाणार आहे. मात्र जिल्ह्यात जनजागृतीच्या अभावामुळे हजारो कामगार या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कामगारांची संख्या ४ हजारांपेक्षा अधिक असली तरी बऱ्याच कामगारांनी आपल्या कार्डचे नूतनीकरण केलेच नाही. जिल्ह्यात जालना, भोकरदन, बदनापूर, परतूर मंठा, अंबड, जाफराबाद घनसांवगी अशा आठ तालुक्यांसह शहरातील बांधकाम कामगारांची संख्या ४ हजार ९३१ एवढी आहे. परंतु नोंंदणीकृत कामगाराची संख्या फक्त २ हजार ९३१ आहे. कामगारांनी ताबडतोब कामगार मंडळ कार्यालयात येऊन आपल्या कार्डचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन कामगार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये धनादेशाद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. कामगार आयुक्त कार्यालयामार्फत अर्थसाह्य वाटप केले जाणार आहे. त्यासाठी झिरो बॅलेन्सवर खाते उघडण्यासाठी कामगारांना सूचना केल्या आहेत. तसे पत्र बँकांना दिले असल्याची माहिती कामगार अधिकाऱ्यांनी दिली.दरम्यान, कामगार नेते अण्णा सावंत म्हणाले की, कामगारांसाठी घर बांधणीस दीड ते दोन लाखांची मदत देणे, मुलांना लॅपटॉप, दिवाळीला बोनस अशा अनेक योजना आल्या. परंतु त्याचा फायदा कामगारांना झाला नाही. जोपर्यंत कामगारांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत या योजनेचे काय होईल सांगता येत नाही. सर्वच योजनांसंदर्भात कामगारांमध्ये व्यापक जनजागृतीची गरज आहे. (प्रतिनिधी)२ हजारावर बांधकाम कामगारशहरात अनेक ठिकाणी बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने तेथे कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या ४ हजार ९३१ आहे. मात्र त्यामधील २ हजार १०२ बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी केली आहे. कामगारांच्या नोंदणी संख्येच्या क्रमवारीत औरंगाबाद नंतर या जिल्ह्याचा क्रमांक लागतो. परंतु नोंदणी न केल्याने हजारो कामगार या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शहरातील अलंकार लेबर नाका, शिवाजी पुतळा, मुजाहिद्दीन चौक, नूतन वसाहत उड्डाणपुलाजवळ, रेल्वेस्टेशन अशा भागात इमारत व इतर बांधकाम कामगार दररोज काम मिळेल, या आशेने थांबलेले असतात.