शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ३ कोटींच्या औषधींवर ‘टाच’

By admin | Updated: March 17, 2016 00:27 IST

औरंगाबाद : फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या तब्बल ३४४ औषधांवर तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे.

औरंगाबाद : फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या तब्बल ३४४ औषधांवर तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. शहरातील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने नोंदणीकृत ३० होलसेलर्स व ६०० किरकोळ औषधी विक्रेत्यांना या औषधी विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी शहरात ३ कोटींपेक्षा अधिक मूल्यांच्या औषधीवर ‘टाच’ आली आहे. उल्लेखनीय म्हणजे औषधी कंपन्यांनी सध्या दुकानदारांना बंदी घातलेल्या औषधींचा साठा तुमच्याकडेच ठेवा, असा सल्लाही दिला आहे. यामुळे औषध विक्रेत्यांना पुढील आदेश येईपर्यंत ही औषधी सांभाळावी लागणार आहेत. बंदी घातलेल्या ३४४ औषधांमध्ये वेदनाशमक, सर्दी, अंगदुखी, पोटदुखीवरील औषधांचा समावेश आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनचा रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो. या औषधांच्या अतिमात्रेमुळे विकलांगता येण्याची शक्यता असल्याचे सांगत तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांवर बंदी आणली. या बंदीची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजकुमार झाडबुके यांनी मंगळवारी औरंगाबाद केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नंतर औषधी भवन येथे संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत ३० होलसेलर्सची बैठक घेण्यात आली. शहरातील ६०० विक्रेत्यांच्या मोबाईलवर ३४४ औषधींवर बंदी आणल्याचा मेसेज संघटनेने पाठविला आहे. यासंदर्भात औषधी वितरक भगवानदास काबरा यांनी सांगितले की, होलसेलरने बंदी घातलेली औषधी विक्री बंद केली असून आमच्याकडे किती स्टॉक आहे, त्याची नोंदणी व ती औषधीचे पॅकिंग करणे सुरू केले आहे.सिडकोतील औषधी विक्रेता गणेश लड्डा यांनी सांगितले की, प्रत्येक किरकोळ विक्रेत्याकडे बंदी घातलेल्या औषधीचा २० ते २५ टक्के साठा आहे. पुढील आदेश आल्यावर आम्ही औषधींचा साठा होलसेलरला पाठवू व ते कंपन्यांना परत पाठवतील. मात्र सध्या आमची रक्कम या औषधीत अडकली आहे.