शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्याची सुनावणी आजपासून

By admin | Updated: June 23, 2016 01:35 IST

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यावर सुनावणी घेण्यासाठी शासनाने चार शासकीय सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर गुरुवारपासून सुनावणी घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यावर सुनावणी घेण्यासाठी शासनाने चार शासकीय सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर गुरुवारपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सुनावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या समिती सदस्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबविण्यात आले आहे. या समितीचा संपूर्ण खर्च मनपा पदाधिकारीच करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.सहा महिन्यांपूर्वी शासनाने मनपाकडे शहर विकास आराखडा सादर केला होता. सर्वसाधारण सभेने आमूलाग्र बदल करून आराखडा प्रसिद्ध केला. आराखड्यावर सुमारे अडीच हजार नागरिकांनी आक्षेप नोंदविले. खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी चार शासकीय सदस्य तर तीन निमशासकीय सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण ७ जणांची समिती २३ जूनपासून सुनावणी घेणार आहे. चार दिवसांपासून मनपाचे पदाधिकारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे तळ ठोकून आहेत. पदाधिकाऱ्यांनी मुंबईहून आलेल्या तज्ज्ञांची पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे. समितीला काय हवे किंवा नको हे पाहण्याचे काम प्रशासनाचे असताना पदाधिकारीच पाहुणचार करीत आहेत. मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी शहर विकास आराखड्यात नियमबाह्य पद्धतीने अनेक बदल केल्याचा आरोप करण्यात येत आहे.