शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जीवन-मृत्यूच्या रेसमध्ये तो जिंकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:27 IST

जीवन-मरणाच्या स्पर्धेत तरुणाने मृत्यूवर विजय मिळविला. ही घटना बीड बायपास रोडवरील बाळापूर फाट्याजवळ पहाटे ३.३० वाजच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रस्त्यावरील लघु पुलाचा अंदाज न आल्याने भरधाव कंटेनर सरळ कठड्याला धडकला. या भीषण अपघातात कंटेनरचा समोरच्या भागाचा चुराडा होऊन दोन जण जखमी झाले. यातील एक जण मात्र कठडा आणि कंटेनरमध्ये अडकून पडला. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर कटरने पत्रा कापून आणि क्रेनच्या साहाय्याने कंटेनर उचलून त्यास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. जीवन-मरणाच्या स्पर्धेत तरुणाने मृत्यूवर विजय मिळविला. ही घटना बीड बायपास रोडवरील बाळापूर फाट्याजवळ पहाटे ३.३० वाजच्या सुमारास घडली.अनिल हरी हराडे (२०, रा. बलसूर, ता. उमरगा, जि. लातूर) असे जखमी चालकाचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, जखमी अनिल हराडे हा वाहनचालक आहे. तो कंटेनरमध्ये मैदा घेऊन धुळे जिल्ह्यातील अमळनेर येथून अनंतापूरकडे (मध्यप्रदेश) जात होता. त्याच्यासोबत आणखी एक चालक आणि क्लीनर होता. रात्रभर अनिल गाडी चालवीत असल्याने औरंगाबादच्या बीड बायपासमार्गे पुढे जात असताना त्याला झोपेची डुलकी लागली आणि त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. यावेळी बाळापूर फाट्याजवळील पुलाच्या क ठड्याला कंटेनर धडकून अडकला. या अपघातात अनिलशेजारी बसलेला दाऊद इस्माईल डांगे, किरकोळ जखमी झाला, तर क्लीनरला कोणतीही दुखापत झाली नाही. कंटेनरच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आणि चालक अनिल याच्या पोटात स्टेअरिंग घुसले आणि हा कमेरेपासून खालीचा भाग कंटेनरच्या केबिनमध्ये अडकला. त्याला जागेवरून हालचालही करताना प्रचंड वेदना होत. पहाटे साडेतीन-चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक सीताराम केदारे आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांना शक्य झाले नाही. शेवटी त्यांनी पत्रा कापणा-यास आणि क्रेनचालकास घटनास्थळी बोलावून घेतले. चार तासांच्या प्रयत्नानंतर कंटेनरच्या केबिनचा पत्रा कापल्यानंतर जखमी अनिलला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्यास बाहेर काढण्यासाठी मदत केली. यानंतर चालकाला घाटी रुग्णालयात दाखल केले.