शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

‘सेबी’ च्या कचाट्यात एचबीएन अडकली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 00:30 IST

श्रीपाद सिमंतकर , उदगीर गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा न दिल्याने एचबीएन कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़

श्रीपाद सिमंतकर , उदगीरगुंतवणूकदारांना वेळेवर परतावा न दिल्याने एचबीएन कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़ त्यामुळे सेक्युरीटिज अ‍ॅन्ड एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडीया (सेबी) च्या मुंबई शाखेने रिजर्व बँक आॅफ इंडीयाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली़ यामध्ये एचबीएन कंपनीच्या संचालकांना चार वर्ष कंपनीचे व्यवहार थांबविण्यात यावे व गुंतवणूकदारांना त्वरीत परतावा द्यावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत़एचबीएन डेअरीज अ‍ॅन्ड अलाईड लिमिटेड कंपनीचे संचालक हरमेंदर सिंग सरन, सतनाम सिंग सरन, अमनदिप सिंग सरन, गजराज सिंग चौहान, मंजीत कौर सरन, जसबीर कौर, राकेश कुमार तोमर, सुखदेव सिंग धिलौन व सुखजीत कौर यांना सेबी ने कंपनी संदर्भात सूचना केल्या़ १२ फेब्रुवारी २०१५ रोजी आदेश क्रमांकडब्लूटीएम/पीएस/७१/ सीआय एस-एनआरओ/ एफईबी/ २०१५ या सेबीने जारी केलेल्या आॅर्डर नुसार संचालकांनी ४ वर्षांकरीता कोणतीही योजना राबवू नये़ कोणत्याही योजनेअंतर्गत रक्कम गोळा करु नये़ तसेच ९ मार्च किंवा त्यापेक्षा १५ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांच्या थकीत रकमा अदा कराव्यात, असे निर्देश दिले़ मात्र त्यानुसार कंपनीने आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही़ संबंधित विषयाची चौकशी करण्यासाठी सेबीच्या वेबसाईट व टोल फ्री नं़ १८००२२७५७५ या क्रमांकाशी संपर्क करुन सेबी आदेशाची खात्री करुन घेण्यात आली़ याठिकाणीही सेबीच्या आदेशासंदर्भात दुजोरा देण्यात आला़ अधिक माहितीसाठी मुंबई सेबी कार्यालयाशी संपर्क साधता येईल, असेही या माहितीत सांगण्यात आले़ एचबीएन कंपनीच्या दिल्ली मुख्यालयाशी त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी ०११-४९६९१२०० क्रमांकावर संपर्क केला असता दूरध्वनी संपर्क होऊ शकला नाही़