शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबादेत हनुमानभक्तांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:06 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणातील तिसºया शनिवारी खुलताबादनगरीत भक्तांनी गर्दी केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणातील तिसºया शनिवारी खुलताबादनगरीत भक्तांनी गर्दी केली होती. यानिमित्त भद्रा मारुतीच्या मूर्तीला आकर्षकरीत्या फुलांनी सजविण्यात आले होते. या आकर्षक सजावटीने येथे आलेल्या भाविकांचे लक्ष वेधले.शुक्रवारी सायंकाळपासूनच धुळे, नाशिक, नगर व औरंगाबाद जिल्ह्यातून खुलताबादनगरीत पायी दिंडी पालखी दाखल होत होत्या, तर रात्री औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून पायी येणाºया भाविकांची वर्दळ सुरू झाली. औरंगाबाद-खुलताबाद, कन्नड-खुलताबाद, फुलंब्री-खुलताबाद, कसाबखेडा फाटा मार्गावरून पायी येणाºया भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रीपासूनच खुलताबाद शहरात जय भद्राचा जयघोष सुरू झाला होता. सकाळी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दर्शनासाठी मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.खुलताबाद पोलिसांनी रात्रीपासून तगडा बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस निरीक्षक हरीश खेडकर व त्यांचे पोलीस कर्मचारी हे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून गर्दीवर, तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, सचिव कचरू पाटील बारगळ, सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत होते.श्रावण महिन्यातील तिसºया शनिवारी भद्रा मारुतीची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. औरंगाबाद येथील जयसुख पटेल, नीलेश देशमुख, संजय काळे, वल्लभ लढ्ढा, कृष्णा भूतडा आदींनी या सजावटीसाठी पुढाकार घेतला. दरम्यान, दोन दिवस सलग सुटी असल्याने भद्रा मारुतीसह वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते, तसेच वेरूळ लेणी पाहण्यासाठी मोठी गर्दी असल्याने लेणी परिसरात वाहनाच्या गर्दीने भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. येथील दौलताबाद किल्ला परिसरही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता.चोख बंदोबस्तखुलताबाद येथे होणारी गर्दी लक्षात घेता श्रावणाच्या तिसºया शनिवारी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. भाविकांचे मोबाइल, पर्स, पॉकेट व दागदागिन्यांची चोरी होऊ नये म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ शेख नदीम, मुळे हे साध्या वेशात फिरून पाकीटमारांवर लक्ष ठेवून होते.