शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही मिळेल अपंगांचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:07 IST

जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात अपंगांचे आॅनलाइन प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था सुरू करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात अपंगांचे आॅनलाइन प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था सुरू करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. यातून प्रमाणपत्रासाठी ग्रामीण भागातून थेट घाटी रुग्णालयात येण्याचा त्रास कमी होणार आहे. शिवाय प्रमाणपत्राची प्रतीक्षायादी कमी होण्यास मदत होणार आहे.अपंग प्रमाणपत्र वाटपाची जबाबदारी ही जिल्हा सामान्य रुग्णालयाची आहे; परंतु औरंगाबादेत स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालय नाही. सध्या या रुग्णालयाचे (मिनी घाटी) बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अपंग प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी घाटी रुग्णालय पार पाडत आहे. घाटी रुग्णालयावर अपंग प्रमाणपत्र वाटपाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय प्रमाणपत्रासाठी जिल्हाभरातून दिव्यांगांना (अपंग) घाटीत यावे लागते. त्यातून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.जिल्ह्यातील दिव्यांगांना ग्रामीण भागातही अपंग प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्यानुसार जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा सुरू करण्याची मागणी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार डॉ. कंदेवाड यांनी वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथे ही सुविधा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित रुग्णालयांना सूचना करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी सांगितले. या सुविधेमुळे अपंगांची होणारी गैरसोय थांबेल, असे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे म्हणाले.