शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्यातील अर्ध्या कामांना फाटा

By admin | Updated: July 14, 2017 00:44 IST

औरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (एनएचएआय) होणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपासच्या प्रस्तावित ७८९ कोटी रुपयांच्या प्रकल्पात मोठ्या कामांना फाटा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

विकास राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (एनएचएआय) होणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपासच्या प्रस्तावित ७८९ कोटी रुपयांच्या प्रकल्पात मोठ्या कामांना फाटा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन किंवा तीन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याबाबत दिल्ली मुख्यालय विचार करीत असल्याचे वृत्त आहे. निधी कमी असल्याने कमी खर्चात हे प्रकल्प मार्गी लावण्याबाबत चिंतन सुरू झाले आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.मुळात एनएचएआय शहरातील रस्ते करण्याबाबत नकारात्मक मोडमध्ये गेले आहे. त्यामुळे जालना रोड आणि बीड बायपासच्या कामाबाबत मुख्यालय दोन आठवड्यात काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. अहमदनगरमधील एलिव्हेटेड रोडचे काम ५ कि़ मी. वरून दीड कि़ मी. वर आणले आहे. तसेच हे काम औरंगाबाद विभागाकडून नाशिक विभागाकडे गुरुवारी हॅण्डओव्हर केले आहे. यावरून लक्षात येते की, एनएचएआय शहरातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कटछाट करण्याच्या मन:स्थितीत आहे. ७८९ कोटींतून प्रस्तावित असलेल्या जालना रोड, बीड बायपासमधील कामांची कपात करण्याचे संकेत आहेत. दोन वर्षांपासून जालना रोड, बीड बायपासच्या रुंदीकरणाबाबत वेगवेगळे आराखडे, घोषणा एनएचएआयने केल्या. परंतु सद्य:स्थितीत हे दोन्ही प्रकल्प आराखड्यानुसार होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सुधारित आराखड्यानुसार काम होण्याची शक्यता कमीबीड बायपास आणि जालना रोडची एकूण लांबी ३० कि़ मी. आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ७८९ कोटी इतकी आहे. सहापदरी या रोडमध्ये सर्व्हिस रोड, सायकल ट्रॅक, फुटपाथसह ४५ ते ६० मीटर डीपी रोडचा समावेश आहे. तीन उड्डाणपूल, ६ भुयारी मार्ग, दोन रेल्वे उड्डाणपुलांचा यामध्ये समावेश आहे. जालना रोडवरील उड्डाणपुलांची संख्या ५ वरून ३ करून भुयारी मार्ग वाढविले. महावीर चौक, आकाशवाणी, रामनगर, अमरप्रीत चौक येथे भुयारी मार्ग तर चिकलठाणा, विमानतळ आणि के म्ब्रिज शाळेजवळ उड्डापणपूल प्रस्तावित केले. बीड बायपासवर एमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौकात उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या आराखड्यानुसार काम होणे सध्या तरी धूसर झाले आहे.