शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त एसपीच्या घरी चोरट्यांची आधी पार्टी, मग चोरी

By admin | Updated: July 16, 2016 01:18 IST

औरंगाबाद : चार दिवसांपासून शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र वाढले आहे.

औरंगाबाद : चार दिवसांपासून शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र वाढले आहे. सुराणानगर येथील व्यापाऱ्याचे घर फोडून ९ लाखांचा ऐवज पळविल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पारिजातनगर येथे राहणाऱ्या निवृत्त पोलीस अधीक्षकांचे घर फोडले. या घटनेत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, दहा किलोच्या चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम, असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी येथे नुसती चोरीच केली नाही, तर ‘पार्टी’ही केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बड्या माजी पोलीस अधिकाऱ्याचेच घर जेथे सुरक्षित नाही, तेथे सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-३ परिसरातील पारिजातनगर येथील रहिवासी एच. आर. जाधव हे पोलीस अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या मुलीची प्रकृती ठीक नसल्याने ते त्यांचा मुलगा महेश आणि परिवारातील सदस्यांसह १२ जुलै रोजी दुपारी पुणे येथे गेले होते. गावी जाताना त्यांनी मोलकरीण मधू यांच्याकडे घराच्या चाव्या दिल्या. १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मधू या जाधव यांच्या घरी गेल्या तेव्हा गेट आणि मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. ही बाब त्यांनी तात्काळ जाधव यांना फोन करून सांगितली. जाधव यांनी त्यांचे चुलतभाऊ श्याम जाधव यांना घरी जाऊन काय झाले ते पाहण्यास सांगितले. त्यामुळे श्याम जाधव तेथे गेले असता चोरट्यांनी कडीकोंडा तोडून चोरी केल्याचे आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे आढळले. त्यानंतर महेश जाधव हे तातडीने औरंगाबादला परतले. १४ रोजी सायंकाळी त्यांनी पाहिले असता चोरांनी ७६ हजार रुपये किमतीचे दागिने, ३ लाख रुपये किमतीच्या देवघरातील सुमारे दहा किलोच्या चांदीच्या दोन समया, ग्लास, वाटी, चमचा, ताट आणि अन्य साहित्य, तसेच रोख दहा हजार रुपये, असा सुमारे ४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांना समजले. १४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी याबाबत तक्रार पुंडलिकनगर पोलिसांकडे नोंदविली.चोरट्यांनी दारूही ढोसली आणि पापडही भाजून खाल्ले...महेश जाधव हे घरी येणार नाहीत, याबाबतची माहिती चोरट्यांना असावी, अशा प्रकारे चोरट्यांनी तेथे बिनधास्तपणे चोरी केल्याचे घटनास्थळावरून दिसून येते. चोरट्यांनी जाधव यांच्या घरात चोरी करताना तेथे दारू प्राशन केली आणि दारू पिताना त्यांनी ‘चकणा’ म्हणून पापड भाजून खाल्ल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी स्वयंपाकघरात चहा उकळून प्यायल्याचे आढळले. चोरट्यांनी गुटखा खाऊन तेथेच पिचकाऱ्या मारल्या, बिड्याही ओढल्या. घटनास्थळी दारूची रिकामी बाटली, गुटख्याचे रिकामे पाऊच, बिडीचे थोटूक आणि चहाचे पातेले, चहापत्ती तशीच ठेवून ते निघून गेले.