शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीतील खरेदी-विक्री निम्म्यावर !

By admin | Updated: November 10, 2016 00:05 IST

लातूर : गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आवक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० आणि हजारच्या नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका बसला.

लातूर : गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आवक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० आणि हजारच्या नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका बसला. एका दिवसात बाजार समितीतील सोयाबीन वगळता इतर धान्याची आवक निम्म्यावर आली तर आवक झालेल्या अर्ध्या मालाची खरेदी-विक्रीही झाली नाही. शेतकऱ्यांनी हजार-पाचशेच्या नोटा घेण्याला विरोध केला तर आडत्याकडे द्यायला शंभरच्या नोटाच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली. येत्या आठ दिवसात नवे चलन हाती येईपर्यंत ही अवस्था राहील, असे अध्यक्ष ललितभाई शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक वाढली होती. सोयाबीनची आवक प्रामुख्याने जास्त होती. बाजार समितीतील या गर्दीला हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे मात्र चांगलाच ब्रेक बसला. जोपर्यंत आडत्यांकडे नवे चलन येत नाही. तोपर्यंत हा ब्रेक राहणार आहे. बाजार समितीत सोयाबीनची आवक स्थिर राहिली. ३१ हजार ८७२ क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आले. मात्र यातील अर्ध्याचीही खरेदी विक्री झाली नाही. गेल्या काही दिवसात सोयाबीनची आवक ४० हजार क्विंटलपर्यंत गेली होती. परंतु ती आता मंदावली आहे. इतर धान्याची आवक तर चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहाराला ब्रेक बसले. आडत असोसिएशनचे अजिंक्य सोनवणे यांनी आवक समाधानकारक होती. परंतु रोख चलनाच्या कमतरतेमुळे व्यवहार मात्र पूर्ण होऊ शकले नाहीत. चार दिवसात व्यवहार रुळावर येतील, असे आडत असोसिएशनचे अजिंक्य सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर सचिव मधुकर गुंजकर म्हणाले की, तांत्रिक बाब आहे. शासनाचा निर्णय हा चांगला असल्याने शेतकरी आणि आडत व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. फक्त यात सुसूत्रता येण्यासाठी सात आठ दिवसांचा कालावधी जाईल, असे सांगितले. तर माल घेऊन आलेले शेतकरी राम शिंदे म्हणाले की, विक्री झाल्यावर बाजार समितीत रोख पैसे मिळतातच. आम्ही गरीब माणसे. आम्हाला बँकेचे काय कळतय. आडत्या पैसे द्यायला नाहीत म्हटल्यावर हसू आले होते. पण सरकारचा निर्णय म्हंटल्यावर थांबू चार दिवस. (प्रतिनिधी)