शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या एटीएमचे ‘शटर डाऊन’!

By admin | Updated: December 29, 2016 22:53 IST

बीड पाचशे- हजार रुपयांच्या नोटा रद्दचा निर्णय होऊन ४८ दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील चलनटंचाई दूर झालेली नाही.

संजय तिपाले  बीडपाचशे- हजार रुपयांच्या नोटा रद्दचा निर्णय होऊन ४८ दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील चलनटंचाई दूर झालेली नाही. शहरातील निम्म्या एटीएममध्ये खडखडाट कायम आहे. डझनभर एटीएमचे शटर चोवीस तास ‘डाऊन’च असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. तथापि, आतापर्यंत पाचशे, हजार रुपयांच्या १२०९ कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या असून ११० कोटी रुपयांच्या नव्या नोटा दाखल झाल्या आहेत. त्यापैकी केवळ २५० कोटी रुपये आतापर्यंत बँकेतून ‘विड्रॉल’ झाले आहेत.नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून आतापर्यंत चलनटंचाईत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्याचा फटका बाजारपेठेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मोठे व्यवहार तर दूरच;पण साधे किराणा सामान खरेदी करायचे म्हटले तरी वांधे निर्माण झाले आहेत. दरम्यान, नागरिकांना सुरुवातीला नोटाबंदलीसाठी बँकेच्या रांगेत थांबावे लागले होते. एटीएम व आॅनलाईन बँकिंग सुविधा नसलेल्यांची तर अधिकच अडचण झाली. त्यांना खात्यातील हक्काचा पैसा मिळविण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले. एटीएम सुविधा असलेल्यांचीही याहून वेगळी स्थिती नव्हती. शहरातील १० ते १२ एटीएम ४८ दिवसांत एकदाही उघडले नसल्याची नवीन माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे काही एटीएममध्ये पैशांचा भरणा होत आहे;परंतु तेथेही पैसे काढण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. परिणामी एटीएम यंत्रात पैसे भरल्यानंतर ते अवघे सहा तासांत संपत आहेत. त्यामुळे लांबलचक रांगेत उभे राहूनही पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नाही. दहा दिवसांपूर्वी सलग तीन सुट्यांमध्ये तर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बँका बंद.. एटीएममध्ये खडखडाट... त्यामुळे चाकरमान्यांना सुट्यांचा आनंदही उपभोगता आला नाही. अनेकांची सुटी पैशांची जुळवाजुळव करण्यातच गेली.नोटबंदीच्या निर्णय होऊन ४८ दिवस उलटले तरीही एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध नाही. त्यामुळे सामान्यांची अडचण कायम असून हातात कार्ड घेऊन त्यांना पैशांसाठी वेगवेगळ्या एटीएमवर खेटे मारावे लागत आहेत. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेकांची लगबग सुरू आहे.