शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

हज यात्रेकरूंचा प्रवास येत्या ७ सप्टेंबरपासून

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेला जाण्याची इच्छा प्रत्येक मुस्लिम बांधवाला होत असते. इस्लाममधील पाच अत्यावश्यक बाबींमध्ये हज यात्रेला

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेला जाण्याची इच्छा प्रत्येक मुस्लिम बांधवाला होत असते. इस्लाममधील पाच अत्यावश्यक बाबींमध्ये हज यात्रेला स्थान देण्यात आले असल्याने दरवर्षी हज यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज प्राप्त होतात. यंदा मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २ हजार ४०० यात्रेकरू जाणार आहेत. ७ सप्टेंबरपासून ही यात्रा सुरू होईल.सौदी अरेबिया सरकारने यंदा भारताच्या कोट्यात २० टक्के कपात केली आहे. त्यामुळे यात्रेकरूंची संख्याही झपाट्याने घटली आहे. मागील वर्षी मराठवाड्यातून ३ हजार ३०९ यात्रेकरू हज यात्रेला गेले होते. यंदा २ हजार ४०० यात्रेकरूंनाच संधी मिळाली आहे. यात्रेकरूंसाठी एकूण पाच प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आले. शेवटचे शिबीर ९ आणि १० आॅगस्ट रोजी जामा मशीद येथे पार पडले. या शिबिरात तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. हज यात्रेतील प्रवास, ‘अहेराम-उमरा’, हजच्या प्रक्रियेतील पाच दिवस, मदिना येथील धार्मिक विधीसंदर्भात माहिती देण्यात आल्याचे मरकज- ए- खिदमात हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी सांगितले. शिबिरासाठी जालना, बीड, परभणी, बुलडाणा, अहमदनगर, जळगाव, नांदेड येथून १८०० पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते.सोमवार ११ आॅगस्टपासून सर्व यात्रेकरूंना मेंदूज्वरची लस देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आज पहिल्याच दिवशी ३६० यात्रेकरूंना लस देण्यात आली. जामा मशीद परिसरातील इमाम हॉल येथे लसीकरण सुरू असून, १३ आॅगस्टपर्यंत दररोज सकाळी ९ ते १२ वाजेदरम्यान लस देण्यात येणार आहे. यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.७ सप्टेंबरपासून मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावरून पवित्र हज यात्रेला रवाना होतील. दररोज २४० यात्रेकरू रवाना होणार असून, १६ सप्टेंबरपर्यंत दररोज एक विमान सुरू राहणार आहे. १८ आॅक्टोबरपासून हज यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे करीम पटेल यांनी नमूद केले.