शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

रविवारपासून हज यात्रेकरूंचा प्रवास

By admin | Updated: September 4, 2014 00:55 IST

औरंगाबाद : हज यात्रेसाठी यंदा मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २ हजार ४०५ यात्रेकरू जाणार आहेत. रविवार, ७ सप्टेंबरपासून यात्रेकरूंचा प्रवास सुरू होणार आहे.

औरंगाबाद : हज यात्रेसाठी यंदा मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २ हजार ४०५ यात्रेकरू जाणार आहेत. रविवार, ७ सप्टेंबरपासून यात्रेकरूंचा प्रवास सुरू होणार आहे. हज यात्रेकरूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, एअर इंडिया, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सीआईएसएफ, आरोग्य विभाग, पोलीस, महापालिका आदींनी विविध तयारी सुरू केली आहे. हज यात्रेसंदर्भात खिदमत-ए-हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी सांगितले की, ७ ते १६ सप्टेंबरदरम्यान दररोज एका विमानाने यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावरून रवाना होतील. एका विमानात २३० ते २३५ यात्रेकरूंचा समावेश राहणार आहे.आमखास मैदानाजवळील ऐतिहासिक जामा मशीद येथे हज कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ओळखपत्र, लसीकरण, आरोग्य प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि छाननी करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी यात्रेकरूंना तिकीट, पासपोर्ट हुज्जाक कमिटीकडे सोपवावे लागेल. तिसऱ्या दिवशी यात्रेकरूंना ‘अहेराम’ घालण्यात येतील. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर बसद्वारे यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावर पोहोचतील. ५ सप्टेंबरपासून यात्रेकरू हज कॅम्पमध्ये दाखल होण्यास सुरुवात होईल. कमिटीतर्फे रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पहिला जथा रवाना होणार आहे. यात्रेच्या पहिल्या चार दिवसांत सायंकाळी ६ वाजता यात्रेकरूरवाना होतील. ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता फ्लाईट जद्दाहसाठी रवाना होणार आहे. १४, १५ आणि १६ सप्टेंबर रोजीही सायंकाळी ६ वाजता विमान उपलब्ध राहील.यात्रेकरूंची संख्याजिल्हायात्रेकरूंची संख्याऔरंगाबाद८९४ जालना २९९नांदेड २९१परभणी२२१बीड २१९अहमदनगर२०३लातूर १४६उस्मानाबाद ७०हिंगोली६२एकूण २४०५