रमेश शिंदे , औसातालुक्यात गारपीठग्रस्त शेतकऱ्यांना वाटप झालेल्या अनुदानात अनेक गैरप्रकार आता उघड होत आहेत़ कधी तलाठी नजर चुकीने नाव लागल्याचे तहसीलदारांना पत्र देतात़ तर कधी शेती कमी अनुदान जास्त असे प्रकार समोर येत आहेत़ औसा शिवारातील तीन शेतकऱ्यांना शेतात पिकच नसताना बनावट नोंदी करून मोठा आर्थिक लाभ घेतला असल्याची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली़ तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांची चौकशी करून गैरप्रकार झाले असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत़ औसा तालुक्यात फेबु्रवारी अखेर व मार्चच्या पहिल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली़ यामध्ये शेतकऱ्यांच्या फळबागा व रबी हंगामाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते़ शासनाने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक या तिघांच्या पथकाद्वारे संयुक्त पंचनामे केले व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली़ नुकसानभरपाईचे वाटप सुरू असताना आता अनेक गैरप्रकार पुढे येत आहेत़ कमी क्षेत्र असणाऱ्यांना जास्तीची नुकसानभरपाई, ज्यांचे प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना लाभ कमी, असे प्रकार आता उघड होऊ लागले आहेत़ या सदंर्भात तक्रारींचा ओघही वाढत आहे़ तहसील कार्यालयात, असे हजारापेक्षा अधिक अर्ज आल्याचे सांगण्यात आले़ औसा शिवारातील सर्वे नंबर ३३२ मधील तीन शेतकऱ्यांना प्रत्येकी ४० हजार नुकसानभरपाई देण्यात आली आहे़ या तीनही शेतकऱ्यांचे क्षेत्र बागायती नाही किंवा त्यांच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोतही नाही़ त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळाला तर त्यांच्या आजुबाजुच्या बागायती शेतकऱ्यांना मात्र अल्प प्रमाणात लाभ देण्यात आला आहे़ याची चौकशी करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती़औसा रेणापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी औसा येथील तहसीलदारांना पत्र दिले असून, सर्वे नं़ ३३२ मधील त्या तीन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी व गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल द्यावा, असे या पत्रात म्हटले आहे़ चौकशीनंतर दोषींवर कारवाई़़़यासंदर्भात तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सध्या पदवीधर निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही़ चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे भारस्कर म्हणाले़
गारपीट मदत वाटपात घोटाळा
By admin | Updated: June 19, 2014 23:57 IST