शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या यादीत घोळ !

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

उमरगा : तालुक्यातील कोराळ येथील गारपीटग्रस्तांच्या यादीतून १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

उमरगा : तालुक्यातील कोराळ येथील गारपीटग्रस्तांच्या यादीतून १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली असून, प्रशासनाने नवीन यादी तयार करून त्यानुसार अनुदानाचे वाटप करावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोराळ येथील अनुदानाच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या येणेगूर शाखेत डकविण्यात आली आहे. परंतु, यातून गावातील १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. याबाबत दाळींबच्या तलाठ्याने ही चूक कृषी सहाय्यकाची असल्याचे सांगितले. याशिवाय बँकेच्या यादीत खाडाखोडही झाली असून, हस्तलिखित नावांचा समावेश करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांच्या नावात बदलही झाले आहेत. त्यामुळे यादीतील नावांची दुरूस्ती करून वगळलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करावीत. तसेच यास जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावर विलास भगत, इंद्रजीत निटुरे, व्यंकट साळुंके, दत्तू सुरवसे, नामदेव सगर, ज्ञानोबा माने, सिद्राम जंगाळे, पांडुरंग गायकवाड, सुनीता जाधव, शाम माडजे, लता सगर, सत्यवान गायकवाड आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)