शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुरूजी येतील तेव्हाच भरते शाळा

By admin | Updated: August 27, 2014 01:35 IST

राउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षकांनी शाळेच्या वेळेलाच बगल दिला आहे. त्यामुळे शिक्षक येईल त्याच वेळेवर शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

राउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षकांनी शाळेच्या वेळेलाच बगल दिला आहे. त्यामुळे शिक्षक येईल त्याच वेळेवर शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.तळेगाव येथील जि. प. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. या शैक्षणिक वर्षापासून आठव्या वर्गाला मान्यता मिळालेली आहे. या आठ वर्गांसाठी शाळेत फक्त सहाच शिक्षक आहेत. मात्र काही शिक्षक अप-डाऊन करीत असल्याने शाळेत वेळेवर येत नाहीत. परिणामी शाळा वेळेवर भरत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट पाहत बसावे लागते. शिक्षक वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी शाळा सोडून बाहेर खेळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शिक्षकांनी शाळेत वेळेवर येणे गरजेचे असताना ते वेळेवर येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देवून उशिराने येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.शाळेचे मुख्याध्यापकही वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेले प्रवेश निर्गमचा उतारा वेळेवर मिळत नाही. त्यासाठी पालकांना शाळेत खेटा माराव्या लागत आहे. (वार्ताहर)या संबंधी घनसावंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विपूल भागवत म्हणाले की, शिक्षकांच्या उशिरा येण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाळांची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले.४शाळेच्या मैदानावर व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. याकडेही शाळेने लक्ष देवून परिसरात स्वच्छता करावी असी मागणी होत आहे.