शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गुरूपिंपरी येथे जलयुक्तच्या कामांत अपहार!

By admin | Updated: December 27, 2016 00:05 IST

जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंपरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाने पूर्ण केलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला

जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंपरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाने पूर्ण केलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, तालुका कृषी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सचिन अरविंद कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, कम्पार्ट बडींगची कामे न करता बोगस बिले तयार करून आर्थिक अपहार करण्यात आला आहे. यात सर्व्हे क्रमांक ३७९, ३८१, ४००, ३७४, ३६६ मध्ये कामे न करताच बिले उचलण्यात आली. तालुक्यात जेसीबीऐवजी ट्रॅक्टरने बांधाची कामे करण्यात आली आहेत. जेसीबी मशीनने चर खोदणे आवश्यक आहे. त्यात चराची रूंदी २. १५ मीटर खोली दीड फुट असेण आवश्यक आहे. ही कामे ट्रॅक्टरद्वारे करण्यात आली आहेत. बांधांना आकार देण्यात आलेला नाही. यासाठी अंदाजपत्रकात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही कामे न करताच मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी करून बिले उचलून आर्थिक अपहार केला आहे. अंदाजपत्रकात तीन पाईची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कोठेही काम करण्यात आलेले नाही. बांधाचा टॉप मेंटन करताना खोट्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. बांधाची लांबी व रूंदी यात तफावत आढळते. सातबारावरील क्षेत्रातही फरक आहे. अनेक कामे निविदान न देताच करण्यात आली आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कोल्हे यांनी जलयुक्त कामांच्या १६ बाबींमध्ये मोठे दोष काढून भ्रष्टाचार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)