शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

प्राथमिक शाळांवरील गुरूजींची १३० पदे वाढली !

By admin | Updated: April 1, 2015 00:58 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने भेडसावत आहे. निमशिक्षकांच्या प्रश्नामुळे तर शिक्षण विभाग कोंडीत सापडला आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने भेडसावत आहे. निमशिक्षकांच्या प्रश्नामुळे तर शिक्षण विभाग कोंडीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरा संच मान्यतेकडे लागल्या असतानाच शासनाने वाढीव पदांची संख्या शिक्षण विभागाला कळविली आहे. त्यानुसार किमान १३० पदे वाढत असल्याने आता अतिरिक्त गुरुजींचा प्रश्न सुटणार आहे. असे असले तरी प्रशालेच्या संचमान्यतेची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.जिल्हा परिषदेंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सातत्याने चर्चेत राहिला आहे. त्यातच निमशिक्षकांची भर पडली. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची कोंडी अधिक घट्ट बनली. शासन निर्णयानुसार नियुक्त्या देण्यात याव्यात, यासाठी निमशिक्षकांकडून मागील चार-पाच महिन्यांपूर्वी तब्बल दोनवेळ उपोषण करण्यात आले. शिक्षण विभागाकडून ‘संच मान्यता आल्यानंतर नियुक्ती देऊ’ असे आश्वासन त्या-त्या वेळी देण्यात आले. मध्यंतरी निमशिक्षक नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशीअंती सदरील प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला होता. हाच मुद्दा पकडत निमशिक्षकांनी १६ मार्च पासून आंदोलन केले. याहीवेळी शिक्षकांना ‘संच मान्यता आल्यानंतर नियुक्ती देऊ’ असे आश्वासन दिल्यानंतर जवळपास चार-पाच दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, अतिरिक्त शिक्षकांसोबतच शिक्षण विभागालाही संच मान्यतेची प्रतीक्षा लागली होती. जिल्हा परिषदेकडून याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तातडीने वाढीव पदांची संख्या सादर करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक शाळांवरील १३० पेक्षा अधिक गुरुजींच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे आता नियमित अतिरिक्त शिक्षकांसोबतच निमशिक्षकांचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, सदरील अहवालामध्ये ३ शाळांना एकही पद मान्य करण्यात आलेले नाही. याबाबत शिक्षण विभागाकडून शासनाला कळविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधित शाळांवर विद्यार्थी संख्याही बऱ्यापैकी असल्याने वाढीव पदांची संख्या १३० पेक्षा अधिक होऊ शकते, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)